पंचायत समिती दर्यापूर व चांदुर रेल्वे मध्ये सेवानिवृत्त शिक्षकांचे निवृत्ती वेतन विलंब झाल्याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. अमरावती यांना निवेदन….

युवराज डोंगरे/खल्लार

         उपसंपादक

     अमरावती जिल्हा परिषद मधील सेवानिवृत्त शिक्षकांचे निवृत्ती वेतनाचे वित्त विप्रेशन वित्त विभाग, जि.प. अमरावती येथून पंचायत समिती स्तरावर 29 मे 2024 ला प्राप्त झाले होते.

          सेवानिवृत्त शिक्षकांचे निवृत्ती वेतन दरमाह एक तारखेस होणे अपेक्षित असतांना जिल्ह्यातील काही पंचायत समिती स्तरावर जाणून बुजून निवृत्ती वेटणाकरिता विलंब केल्या जातो.

        शासनातर्फे निवृत्ती वेतन निधी पंचायत समिती स्तरावर प्राप्त झाल्यावरही पंचायत समिती स्तरावर वेतन विलंब होत असल्याने सेवानिवृत्त शिक्षकांमध्ये असंतोष पसरला आहे.पंचायत समिती स्तरावर प्रत्येक महिन्यात वेतन विलंब होत आहे.

         यावर पंचायत समिती स्तरावर हेतुपुरस्सर दुर्लक्ष होत आहे. त्याचा परिणाम सेवानिवृत्त शिक्षकांच्या आर्थिक परिस्थितीवर पडत आहे.प्रत्येक महिन्यात काही पंचायत समिती नित्याने वेतन विलंब जातीत असल्याने याही महिन्यात मे महिन्यात जिल्हा स्तरावर पंचायत समिती स्तरावर 29 मे 2024 ला वेतन निधी प्राप्त झाल्यावरही दर्यापूर पंचायत समिती व चांदुर रेल्वे पंचायत समिती मधील सेवानिवृत्त शिक्षकांचे निवृत्ती वेतन दिनांक6 जून 2024 पर्यंत न झाल्याने दर्यापूर पंचायत समिती व चांदूर रेल्वे पंचायत समिती मधील सेवानिवृत्त शिक्षकांच्या मागणी अर्जासह चेतवा कर्मचारी संघटने तर्फे संतोष जोशी मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. अमरावती यांना दिनांक 7 जून 2024 ला निवेदन देण्यात आले आहे.

         निवेदनात सेवानिवृत्त शिक्षकांचे निवृत्ती वेतन पंचायत समिती समिती स्तरावर निवृत्ती वेतन विलंब न करणे सह प्रत्येक महिन्यात सेवानिवृत्त शिक्षकांचे निवृत्ती वेतन एक तारखेस करण्याची मागणी करण्यात आली आहे.

          निवेदन देते वेळी सत्येंदु अभ्यंकर वासुदेव रचे प्रभाकर देशमुख अक्षय साबळे व इतर सेवानिवृत्त शिक्षक उपस्थित होते.