शिक्षकांना केंद्रप्रमुख व मुख्याध्यापकपदी पदोन्नती मिळणार.

युवराज डोंगरे/खल्लार 

            उपसंपादक 

 अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाने मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.अमरावती यांना दिलेल्या निवेदनानुसार संघटनेला चर्चेसाठी निमंत्रित करण्यात आले होते.

         या चर्चेदरम्यान अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाने दि. ९ फेब्रुवारिला केलेल्या आंदोलनाच्या दरम्यान तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिलेल्या आश्वासनांची आठवण करून देण्यात आली.

          तेव्हा मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केंद्र प्रमुख पदोन्नती ही १५ जून पर्यंत तर उच्च श्रेणी मुख्याध्यापक पदोन्नती ३१ जुलै पर्यंत करण्यात येईल असे ठोस आश्वासन दिले.

         त्यामुळे अमरावती जिल्हा परिषदेतील जवळपास ५२ शिक्षकांना केंद्रप्रमुख पदी तर ९७ शिक्षकांना उच्च श्रेणी मुख्याध्यापक पदी पदोन्नती मिळणार आहे. तसेच विषय शिक्षक पदोन्नती ३१ जुलैपर्यंत करण्यात येणार आहे.

         निवड श्रेणी प्रस्ताव ३० सप्टेंबर पर्यंत पूर्ण करण्यात येतील असे आदेश मु.का.अ.संतोष जोशी यांनी शिक्षण विभागास दिले.विषय शिक्षकांना वेतनश्रेणी शासन निर्णयाप्रमाणे लावण्यात येईल. पेसा क्षेत्रामध्ये न्यायालयाचा निकाल लागेपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात शिक्षक भरती करण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविन्याय येईल असे मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे आश्वासन दिले.

           बदली झालेल्या शिक्षकांना कार्यमुक्त करणे याविषयी सुद्धा सकारात्मक चर्चा झाली. १ जून ते ३० जून दरम्यान पर्यंत प्रत्येक पं. समध्ये सेवापुस्तके अद्ययावत करणे व जुलै पासून भरारी पथकाद्वारे तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

           प्रसृती रजा प्रकरणी पगार नियमित पणे काढण्यात यावा तसेच रजा खाती शिल्लक असल्यास मंजूर करून पगार थांबविण्याची गरज नसल्याचे सांगण्यात आले.

         पं.स.स्तरावरील प्रलंबित विषय गटशिक्षणाधिकारी यांचे सभेत ठेवण्यास सांगण्यात आले. सभेला जिल्हाध्यक्ष गजानन चौधरी, सरचिटणीस सुभाष सहारे कोषाध्यक्ष संजयजी साखरे, ज्येष्ठ सल्लागार निळकंठरावजी यावले, सुभाष सावळकर, गजानन बडवाईक व उज्वल पंचवटे उपस्थित होते असे प्रसिद्धी प्रमुख सुरज मंडे यांनी कळविले आहे.