ब्रेकिंग न्यूज.. — पत्रकार म्हणून अधिकाऱ्याला फोन करणाऱ्या अनोळखी इसमावर कारवाई करा..

         राजेंद्र रामटेके 

ग्रामीण तालुका प्रतिनिधी कुरखेडा…

        मौजा सोनसरी परिसरात अनेक दिवसापासून मी राजू रामटेके पत्रकार बोलतो म्हणून रात्रंदिवसा अधिकाऱ्याला त्रास देणे सुरू असून सदर गोरख धंदा करणेवाला आणि पत्रकार राजू रामटेके यांच्या नावाचा गैरफायदा घेणेवाला इसम नेमका कोण आहे याचा शोध घेणे आवश्यक आहे.

         सदर बेजबाबदार इसम पत्रकराच्या नावावर बदनाम करीत असून या व्यक्तीवर रीतसर गुन्हा नोंद करण्यात यावा अशी मागणी जोर धरतआहे.

       तद्वतच ज्या अधिकाऱ्यांना पत्रकार राजू रामटेके यांच्या नावाला अनुसरून काॅल जातात त्या अधिकाऱ्यानी सदर इसमाचा फोन पोलिस अधिकाऱ्यांना सांगून ट्रॅक करावे अशी जनमानसात चर्चा आहे.

             मी राजू रामटेके पत्रकार आहे असे अधिकाऱ्याला सांगून फोन करून बदनाम करीत असलेल्या व्यक्तीचा फोन आल्यास सदर मो.न.९४०३२२७७५१ या न.वर संपर्क करावा असे आवाहन राजेंद्र रामटेके यांनी जनतेला सांगितले आहे.सदर व्यक्ती मला बदनाम करीत असून त्यांच्यावर पोलीस स्टेशन मध्ये तक्रार करणार आहे.

       असे तोतया पत्रकपासून अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सावध रहावे व सहकार्य करावे असी विनंती राजेंद्र रामटेके यांनी सार्वजनिक रित्या केली आहे.