शिवसेना (शिंदे गट) पुणे जिल्हाउपप्रमुखपदी प्रकाश वाडेकर यांची निवड…

दिनेश कुऱ्हाडे

   प्रतिनिधी

खेड : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्यनेते एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार शिवसेना सचिव संजय मोरे आणि शिवसेनेचे पुणे जिल्हा प्रमुख भगवान पोखरकर यांच्याशी विचार विनिमय करून शिवसेना (शिंदे गट) पुणे उपजिल्हा प्रमुखपदी (कार्यक्षेत्र खेड-आळंदी विधानसभा) प्रकाश वाडेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे, यावेळी शिवसेना उपनेते खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आणि जिल्हाप्रमुख भगवान पोखरकर यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देऊन निवड करण्यात आली.

       खेड-आळंदी विधानसभा मतदार संघाच्या शिवसेना पक्षाची बाजू मांडण्यासाठी, शिवसेना कार्य, ध्येय धोरण, तळागाळातील शिवसैनिक, जनते पर्यंत पोहचण्यासाठी, व संघटना मजबुतीकरणासाठी, पुणे शिवसेना उपजिल्हाप्रमुख पदी प्रकाश वाडेकर यांची निवड करण्यात आलेली आहे असे जिल्हा प्रमुख भगवान पोखरकर यांनी सांगितले.

             प्रकाश वाडेकर हे खेड तालुक्यातील जुने शिवसैनिक असून त्यांनी शिवसेना खेड तालुकाप्रमुख म्हणून यापूर्वी काम केले आहे.