अर्थशास्त्र विभागाद्वारे आयोजित आर्थिक साक्षरता कार्यक्रमांतर्गत ग्राम हिवरा पूर्णा येथे कार्यक्रम संपन्न..

रत्नदिप तंतरपाळे/ चांदूरबाजार तालुका प्रतिनिधी

        छत्रपती शिवाजी कला महाविद्यालय आसेगाव पूर्णा अर्थशास्त्र विभागाच्या वतीने आर्थिक साक्षरता अभियानांतर्गत भारतीय रोजगाराची स्थिती या विषयावर प्राध्यापक डॉक्टर मुकुंद दातीर यांची व्याख्यान संपन्न झाले.

       या व्याख्यानाला मध्ये डॉक्टर दातीर यांनी सांगितले की सर्वात जास्त रोजगार देण्याची क्षमता शेती क्षेत्रामध्ये आहे.पण आज कामगारांमध्ये कौशल्य विकसित करण्याची गरज त्यांनी प्रतिपादन केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावातील प्रतिष्ठित नागरिक वाटाणे हे होते.

         कार्यक्रमाचे संचालन रोशन प्रजापती यांनी केले तर आभार प्रदर्शन अक्षय खंडारे यांनी केले. व्याख्याने गावातील नागरिक उपस्थित होते या कार्यक्रमाप्रसंगी गावातील नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

        अशाप्रकारे कार्यक्रम गावामध्ये नेहमीच महाविद्यालयाने आयोजित करावे अशी याप्रसंगी इच्छा व्यक्त केली.