छत्रपती शिवाजी कला महाविद्यालयामध्ये गृह अर्थशास्त्र विभागाच्या वतीने रांगोळी पुष्परचना डिश डेकोरेशन स्पर्धा संपन्न…

रत्नदिप तंतरपाळे/ चांदूर बाजार तालुका प्रतिनिधी

       छत्रपती शिवाजी कला महाविद्यालय आसेगाव पूर्णा शिवपूर्णा उत्सव २०२३ महोत्सवाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा म्हणून गृह अर्थशास्त्र विभागाच्या वतीने रांगोळी स्पर्धा डिश डेकोरेशन पुष्परचना आयोजन करण्यात आले होते.

      या स्पर्धेमध्ये महाविद्यालयातील एकूण ४० विद्यार्थिनींनी आपला सहभाग नोंदविला.स्पर्धेचे आयोजन गृह अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर प्राध्यापक सुवर्णा जवंजाळ यांच्या मार्गदर्शन करण्यात आला.

      यासाठी अधीक्षक म्हणून मुक्ता निंभोरकर यांनी सहकार्य केले त्याचप्रमाणे महाविद्यालयातील विद्यार्थिनी गायत्री मानकर, सुनिता कांबळे, तेजस्विनी गावंडे, धनश्री देशमुख, गायत्री दवंगे यांनी स्पर्धेच्या यशस्वीरित्या परिश्रम घेतले.

      संस्थेचे सचिव भैय्यासाहेब कडू यांनी राष्ट्रसंत गुरुकुल आश्रम शाळेचे मुख्याध्यापक आशिष डोके यांच्या स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.