माजी विद्यार्थी व पालक मेळावा संपन्न..

रत्नदिप तंतरपाळे/ चांदूरबाजार तालुका प्रतिनिधी

      छत्रपती शिवाजी कला महाविद्यालया आसेगाव पूर्णा मध्ये शिवपूर्णा उत्सव २०२३ महोत्सव पार पडला.या उत्सवामध्ये विद्यार्थ्यांच्या गुणांना वाव देण्याच्या उद्देशाने विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.

       त्यामध्ये विविध मैदानी स्पर्धा,वकृत्व स्पर्धा,व्याख्यान, रांगोळी स्पर्धा, डिश डेकोरेशन, शिवप्रश्न मंजुषा,निबंध स्पर्धा, अशा विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या.

       त्याचप्रमाणे माजी विद्यार्थी व पालक मेळावा आयोजित करण्यात आला होता.त्यामध्ये माजी विद्यार्थी संघाचे सर्व सदस्य उपस्थित होते. त्यांनी या कार्यक्रमांमध्ये आपल्या महाविद्यालया विषयाचे मनोगत व्यक्त करून माजी विद्यार्थी संघटना मजबूत करण्याचा मानस व्यक्त केला.महाविद्यालयाच्या भावी विकासात्मक कार्यक्रमाबद्दल चर्चा केली.

       या कार्यक्रमानंतर पालक सभा संपन्न झाली.या कार्यक्रमास मार्गदर्शक म्हणून डॉक्टर प्राध्यापक भारत कल्याणकर, डॉक्टर प्राध्यापक प्रवीण सदार, डॉक्टर प्राध्यापक आशिष काळे,डॉक्टर प्राध्यापक सुवर्णा जवंजाळ, प्राध्यापक विपिन लिल्लारे मुक्ता निंभोरकर, दिनेश वाटाणे,विष्णू घोम, अविनाश कडू,संजय सोळंके व महाविद्यालयामधील विद्यार्थी उपस्थित होते. 

       या कार्यक्रमाचे संयोजक रवींद्र ईचे होते.सर्वांच्या उपस्थितीने व सहकार्याने हा कार्यक्रम व्यवस्थित पार पडला.