छत्रपती शिवाजी कला महाविद्यालयामध्ये अर्थशास्त्र विभागाच्या वतीने अतिथी व्याख्यान संपन्न..

रत्नदिप तंतरपाळे/ चांदूरबाजार तालुका प्रतिनिधी

      छत्रपती शिवाजी कला महाविद्यालय आसेगाव पूर्णा अर्थशास्त्र विभागाच्या वतीने भारतीय रोजगाराची स्थिती या विषयावर व्याख्यान सोमवार ला संपन्न झाले.या व्याख्यानाला प्राध्यापक डॉक्टर मुकीद दानीर जगदंब महाविद्यालय अचलपूर हे उपस्थित होते.

       या अतिथी व्याख्यानामध्ये डॉक्टर मुकुंद दातीर यांनी नियोजन काळापासून ते आजपर्यंतची रोजगाराची स्थिती दर्शवून भविष्यातील रोजगाराची स्थिती ही विद्यार्थ्यांच्या कौशल्यावर आधारित राहील असे प्रतिपादन केले.त्याचप्रमाणे संपत्तीचे असमान वितरण सुद्धा बेरोजगाराला कशी कारणीभूत आहे हे उदाहरणासह विद्यार्थ्यांना पटवून सांगितले. 

         या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्राचार्य डॉक्टर भारत कल्याणकर होते.कार्यक्रमाचे आयोजक अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर रवींद्र ईचे डॉक्टर आशिष काळे,डॉक्टर सुवर्णा जवंजाळ, डॉक्टर प्रवीण सदार,प्राध्यापक विपिन लिल्लारे उपस्थित होते.

       या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर रवींद्र ईचे यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धाकडे बीए भाग २ यांनी केले व कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सिद्धी सोळंके बीए भाग २ हिने केले.

      अशाप्रकारे सर्व विद्यार्थ्यांचे अथक प्रयत्नातून हा कार्यक्रम संपन्न झाला.