कन्हान परिसरातून अवैध वाळू वाहतुक करणाऱ्यांवर पोलीस अधिक्षक विषेश पथक पोलीसांची मोठी कारवाई. — ५ ट्रक,१५आरोपी,३३ ब्रास रेतीसह एकुण १ करोड २७ लाख ९० हजार १६० रुपयांचा मुद्देमाल जप्त.

     कमलसिंह यादव

तालुका प्रतिनिधी पारशिवनी 

कन्हान : – कन्हान पोलीस स्टेशन हद्दीत नागपुर ग्रामीण पोलीस अधिक्षक विषेश पथक पोलीसांनी विना राॅयल्टी वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रक चालकांवर कायदेशीर कारवाई केली.

           याचबरोबर बनावटी नंबर प्लेट लावुन शासनाची दिशाभुल करुन फसवणुक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करुन पाच ट्रक रेतीसह एकूण एक करोड पेक्षा अधिक रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.सदर १५ आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

            पोलीस अधिक्षक विषेश पथक पोलीसांच्या मोठ्या कारवाई मुळे विना राॅयल्टी वाळुची वाहतुक करणाऱ्यांचे दाबे दणाणले असुन पारशिवनी पोलिस व कन्हान पोलीसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्न निर्माण झाले आहे.

           प्राप्त झालेल्या माहिती नुसार रविवार आणि सोमवारला रात्रीच्या दरम्यान नागपुर ग्रामीण पोलीस अधिक्षक हर्ष पोद्दार यांचा आदेशानुसार अवैधरित्या वाळु वाहतुकीवर कारवाई करने कामी नागपुर ग्रामीण पोलीस अधिक्षक विषेश पथक पोलीस कन्हान परिसरात पेट्रोलिंग करीत असतांना गुप्त बातमीदारा कडून माहिती मिळाली कि परिसरात मोठ्या प्रमाणात विना राॅयल्टी आणि बनावटी नंबर प्लेट लावुन पारशिवनी वरून वाळुची वाहतुक सुरु आहे.

           अशा मिळालेल्या विश्वसनीय माहिती वरुन पोलीसांनी ठिकठिकाणी नाकाबंदी करुन संशयित टिप्पर ट्रक क्रमांक (१) एम एच ४०,ए.के ०२८३, (२) टिप्पर ट्रक बनावटी वाहन क्रमांक एम एच ४०,बी.जी १२६७, (३) एम एच,३५ ए जे ०१३१,(४) एम एच ४०, बि एल १२८३ ,(५) एम एच ४९,बी झेड ९१६८ ला थांबवून पाहणी केली असता ट्रक मध्ये मोठ्या प्रमाणात वाळू दिसून आली.

          पोलीसांनी ट्रक चालकांना वाळुची राॅयल्टी बाबत विचारना केली असता राॅयल्टी नसल्याचे चौकशी दरम्यान दिसुन आल्याने आणि बनावटी नंबर प्लेट लावुन वाळुची वाहतुक करतांना आढळुन आल्याने पोलीसांनी नऊ आरोपींना ताब्यात घेऊन त्यांचा जवळुन ५ ट्रक ,३३ ब्रास रेती,आणि मोबाइल,नगदी रुपये सह एकुण १ करोड २७ लाख ९० हजार १६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

          जप्त मुद्देमाल पुढील कारवाई करिता कन्हान पोलीसांच्या स्वाधिन केले.सदर प्रकरणा बाबत कन्हान पोलीसांनी सरकार तर्फे फिर्यादी सहायक पोलीस निरीक्षक अमित पांडे,हवालदार ललीत उईके यांचा तक्रारी वरून आरोपी १) मोरेश्वर दशरथ गोंडाने (वय ३३) ,२) रोहित रामदासजी भोले (वय २०),३) नरेश कृष्णाजी चवरे (वय ३३) , ४) रोशन मुरलीधर मेश्राम (वय २९) , ५) फरार आकाश माहतो (वय ३०) , ६) फरार राहुल तिवाडे (वय ३२) सर्व रा.कन्हान , ७) फरार लोकेश वहीले (वय २५) , ८) भुषण देवीदास भुरे (वय २६ ) , ९) अभिषेक दिलीप मेश्राम (वय २३) सर्व रा.कामठी , १०) फरार अक्षय राजु गात (वय २८) , ११) लीखीराम बसीराम शेंडे (वय ३९ ) दोन्ही रा.नागपुर , १२) फरार चंद्रशेखर फुंडे रा.गोंदिया , १३) मनीराम सत्यराम जयतवार (वय ५४) रा.भंडारा, १४)विक्की मनोहर शेंडे (वय ३२) रा.उमरवाडा,१५) फरार मंगेश तुलाराम राऊत रा.भंडारा यांचा विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास पोलीस निरीक्षक सार्थक नेहेते यांचा मार्गदर्शनात कन्हान पोलीस करीत असून फरार आरोपीचा शोध घेत आहे.