कन्हान शहर विकास मंच द्वारा पत्रकार बांधवांचा सत्कार.‌..

    कमलसिंह यादव

तालुका प्रतिनिधी पारशिवनी 

कन्हान : – शहर विकास मंच द्वारा मराठी पत्रकारितेचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीचे औचित्य साधुन पत्रकार दिवस कार्यक्रमाचे आयोजन पोलीस स्टेशनच्या बाजुला हनुमान मंदिर परिसर गांधी चौक येथे करण्यात आले होते. 

           कार्यक्रमाचे अध्यक्ष एन. एस.नारायण मालवीये,प्रमुख पाहुणे म्हणून कन्हान ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष मोतीराम रहाटे,कामठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नंदु कोल्हे,जेष्ठ पत्रकार शांताराम जळते प्रामुख्याने उपस्थित होते.

          आदि मान्यवरांचा हस्ते आचार्य बाळ शास्त्री जांभेकर यांचा प्रतिमेला पुष्पहार अर्पण आणि दीप प्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली.

         कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांनी बाळशास्त्री जांभेकर यांचा जीवन चिरित्र्यावर आणि पत्रकार दिवसावर उपस्थितांना मार्गदर्शन करुन पत्रकार दिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

          त्यानंतर कन्हान शहर विकास मंच पदाधिका-यानी पत्रकार बांधवांचा डायरी,पेन,आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. 

           तसेच शाहीर राजेंद्र भीमराव बावनकुळे राष्ट्रीय अध्यक्ष भारतीय कलाकार शाहीर मंडळ द्वारे पत्रकारांचा शाॅल,श्रीफल आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. 

           शेवटी अल्पोहार वितरित करुन कार्यक्रमाची सांगता करून बाळशास्त्री जांभेकर जयंती पत्रकार दिवस म्हणुन उत्साहाने थाटात साजरा करण्यात आला. 

          कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्रदीप बावने यांनी तर आभार महेश शेंडे यांनी केले.याप्रसंगी कन्हान शहर विकास मंच मार्गदर्शक भरत सावळे,ताराचंद निंबाळठर,प्रभाकर रुंघे,जेष्ठ पत्रकार चंद्रकुमार चौकसे,कमलसिंग यादव,राजेंद्र बावनकुळे,भरत पगारे,अशोक पाटील,मोहम्मद शकीब शेख,गणेश खोब्रागडे,अनिल जाधव,किशोर वासाडे,रवि दुपारे,रोहित मानवटकर,आकाश पंडितकर,निलेश गाढवे सह नागरिक बहु संख्येने उपस्थित होते. 

         कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता कन्हान शहर विकास मंच संस्थापक अध्यक्ष ऋृषभ बावनकर,प्रदीप बावने,कैलास डाले,योगराज आकरे,अरविंद कटाले,महेश शेंडे,राहुल सोनबरसे,अर्जुन पात्रे,हरी ओम प्रकाश नारायण,मनिष शंभरकर,महेर इंचुलकर आदि मंच सदस्यांनी सहकार्य केले.