पुण्यात १५ ऑक्टोबर रोजी “मुक्ताई – एक मुक्ताविष्कार” एकपात्री नाट्याविष्काराचा 300 वा कृतज्ञता प्रयोग….

दिनेश कुऱ्हाडे

उपसंपादक

पुणे : आळंदी देवस्थानचे माजी विश्वस्त वैद्य प्रशांत सुरू यांनी दिग्दर्शन तसेच वैद्य प्रफुलता सुरु लिखित मुक्ताई एक मुक्ताविष्कार संत मुक्ताबाईंचे जीवन चरित्र मांडणारा एकपात्री नाट्याविष्कार वैद्य प्रचीती सुरु – कुलकर्णी गेली 23 वर्षे झाली सादर करत आहे. ह्या 23 वर्षात देश विदेशात जगातील पाचही खंडांमध्ये ही नाट्यविष्कार सादर करण्यात आले आहे.

         सन २००० साली सर्वप्रथम मुक्ताईच्या महानिर्वाण तिथीलाच ह्या आविष्काराचा पहिला प्रयोग पुण्यातील भरत नाट्य मंदीर येथे सादर केला होता. ज्या मुक्ताईचं आयुष्यच अवघं १८ वर्षांचं होतं, त्याचं सादरीकरण करण्याचं भाग्य गेली 23 वर्षे आम्हाला मिळालं ही केवळ माउलीचीच कृपा आहे असे वैद्य प्रचीती सुरु – कुलकर्णी यांनी सांगितले आहे. या 23 वर्षांच्या वाटचालीत असंख्य ज्ञात – अज्ञात, संत -महंत, तसेच अध्यात्मिक -सामाजिक ज्येष्ठ -श्रेष्ठ व्यक्तींचे अमूल्य योगदान आहे. या सर्वांचेच ऋण व्यक्त करण्याची ही संधी यंदा याचा 300 वा प्रयोग – मुक्ताईच्या प्रकटदिना निमित्त – घटस्थापनेच्या तिथीला – 15 ऑक्टोबर -2023 रोजी संध्याकाळी 5:30 वाजता त्याच “भरत नाट्य मंदिरात ” सादर करण्यात येणार आहे.

            यावेळी प्रत्यक्ष पांडुरंग परमात्मा ते -निवृत्ती – ज्ञानदेव – सोपान – मुक्ताबाई – एकनाथ – नामदेव – तुकाराम आदि देवस्थानचे विश्वस्त व उपस्थित राहणार आहेत. तसेच गो.बं.देगलूरकर, वीणा देव, ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी, डॉ.गिरीश ओक तसेच ज्येष्ठ रंगकर्मी, साहित्यिक व समाजभूषण व्यक्ती उपस्थित राहणार आहेत.