कोविड साथीतील मदत कार्याबद्दल राकेश धोत्रे यांचा सन्मान….

दिनेश कुऱ्हाडे

उपसंपादक

पुणे : कोविड साथितील काळात पुणे शहरातील मदतकार्यात सहभागी झाल्याबद्दल सामाजिक कार्यकर्ते राकेश धोत्रे यांची नोंद ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस’ ने एप्रिशिएशन विभागात केली आहे. नॅशनल ग्रीन ट्रॅब्यूनल बार असोसिएशन(पुणे)चे अध्यक्ष ॲड.सौरभ कुलकर्णी यांच्या हस्ते त्यांनी प्रमाणपत्र स्वीकारले.

          कोरोना महामारीच्या काळात शासकीय यंत्रणेकडून मदत सुरू होईपर्यंत धोत्रे यांनी पुणे शहरामध्ये अखंड रुग्णसेवा केली. सर्व गरजू नागरिकांसाठी केलेले अन्नदान, धान्यवाटप, पोलीस कर्मचारी, पुणे मनपाचे सफाई कर्मचारी व इतर शासकीय सेवेतील सर्व कर्मचारी यांच्यासाठी औषध वाटप, सॅनिटायझर व मास्क वाटप केले. त्याचप्रमाणे पर्यावरण संवर्धन , संरक्षण आणि प्रदूषण नियंत्रण या क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामांमुळे राकेश धोत्रे यांचा हा सन्मान झाला. ‘राकेश धोत्रे यांचे योगदान मानवतेसाठी महत्त्वपूर्ण ठरले आहे. कठीण काळात त्यांनी केलेली मानवसेवा संस्मरणीय आहे’; असे उद्गार ॲड.सौरभ कुलकर्णी यांनी काढले.