डॉक्टर संजय मुरकुटे यांना दीक्षांत समारंभात आचार्य पदवी प्रदान..

धानोरा /भाविक करमनकर 

श्री साईबाबा ग्रामीण विकास संस्था द्वारा संचालित श्री जी सी पाटील मुनघाटे कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय धानोरा येथील क्रीडा व शारीरिक शिक्षण विभाग संचालक डॉ संजय जनार्दन मुरकुटे यांना गोंडवाना विद्यापीठाच्या दहाव्या दीक्षांत समारंभ मध्ये भारताच्या महामयीन राष्ट्रपती श्रीमती द्रोपदी मुर्मू यांच्या प्रमुख उपस्थिती गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर प्रशांत बोकारे यांचे शुभ हस्ते आचार्य पदवी देऊन अभिनंदन करण्यात आले डॉक्टर संजय जनार्दन मुरकुटे यांचे मार्गदर्शक डॉक्टर रमेशचंद्र शर्मा यांच्या मार्गदर्शनात शारीरिक शिक्षण विभागात ए स्टडी ऑफ हेल्थ रिलेटेड फिजिकल फिटनेस ऑफ स्टुडन्ट ऑफ ट्रायबल एरिया या विषयावर आचार्य पदवी प्रदान केली त्यांनी आपल्या यशाचे श्रेय मार्गदर्शक डॉ. शर्मा स्व. डॉ. ओमप्रकाश अनेजा व वडील प्रा जनार्दन मुरकुटे आई सौ दुर्गा मुरकुटे व पत्नी स्वाती मुरकुटे आप्त स्वकीय यांना दिले.

    श्री साईबाबा ग्रामीण विकास संस्था गडचिरोलीचे अध्यक्ष श्रीमती शालिनीताई रमेशचंद्र मुनघाटे श्रीमती आशी आशिष रोहनकर कार्याध्यक्ष श्रीमती मीनल ऋषी सहानी सचिव सौरभ रमेशचंद्र मुनघाटे सहसचिव तथा सर्व पदाधिकाऱ्यांनी डॉ मुरकुटे यांचे अभिनंदन केले व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ पंकज आर चव्हाण व प्राध्यापक वृंद तथा सर्व प्रशासकीय वृंद इत्यादींनी अभिनंदन केले.