डॉ. जगदीश वेन्नम/संपादक
गडचिरोली:-गडचिरोली जिल्ह्यातील एकमेव कोनसरी येथील लॉयड्स मेटल्स एनर्जी लिमिटेडच्या संकुलात दिनांक:-07जुलै 2023रोजी पर्यावरण विषयक जाहीर जनसुनावणी घेण्यात आली.
जनसुनावणीत जिल्ह्याचे लोकप्रतिनिधी खा. अशोक नेते, आमदार . डॉ. देवराव होळी, माजी आमदार दिपक दादा आत्राम, जिल्हाधिकारी संजय मीना, व चंद्रपूर येथील पर्यावरण विभागाचे अधिकारी लॉयड्स मेटल्सअँड एनर्जी लिमिटेड कंपनीचे संचालक बी. प्रभाकरण उपस्थित होते.
महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ प्रादेशीक कार्यालय चंद्रपूर याच्या तर्फे सदर जनसुनावणी लॉयड्स मेटल अँड एनर्जी लिमिटेडच्या प्रकल्प स्थळी कोनसरी येथे आयोजन करण्यात आले होते पर्यावरण विषयक जाहीर जनसुनावणीत स्थानिक प्रकल्प क्षेत्र पारिसरातील अनेक सरपंच, उपसरपंच, भुमीधारक, भूमीहीन, ग्रामपंचायत सदस्य तथा ग्रामस्थांनी पर्यावरण विषयक मुद्देला बाजु सारून स्थानिक सुशिक्षीत तथा अशिक्षीत बेरोजगारांना रोजगार, शैक्षणिक अर्हतेनुसार वेतन, वेतन वाढ प्रत्येक घरातील किमान दोन सदस्यांना कंपनीच्या सेवेत समावून घ्या, शुभीधारक प्रकल्प ग्रस्त कुटुंबीयांना करार केल्याप्रमाणे रोजगार देण्याची मागणी जमीणी दिलेल्या शेतकऱ्यांना प्रकल्पग्रस्त घोषित करुन प्रमाणपत्र देण्यात यावे, परिसरातील प्रकल्पग्रस्त प्रत्येक गावातील रस्ते, पिण्याचे पाणी आरोग्य सुविधा, इतर भौगोलिक तथा भौतीक सुविधा कंम्पनी कडून सदर गावे दत्तक घेवून सर्व सोयी सुविधा पुरविण्यात याव्यात शिवाय – औद्योगिक प्रशिक्षण केंद्र, वाचनालय, व्यायाम शाळा, कॉन्व्हेंट , आदी सुविधा कंपनीने प्रदान करावी असे प्रत्येकांनी एकच सुर काढले पर्यावरण विषयक महत्वाचे मुध्यावर जास्त भर जरी दिलेला नाही पण कंपनीचे चिमनी आधिकाधिक ऊंचावर लाऊन वायूप्रदूषण रोखावे शुद्ध पाणी, प्रत्येक गावात वृक्षारोपण करण्यात यावीत, सांड पाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी त्या पाण्याचा शेतीसाठी लाभ होतो काय ह्यावर उपाय योजना करण्यात यावी. परिसरात एक मल्टीस्पेशालिटी रुग्णालय कंपनीने उभारावे जेणेकरून परिसरातील जनसामान्यांना उत्तम आरोग्य सेवा मिळू शकेल. कोनसरी येथे राष्ट्रीयकृत बँकेची स्थापना करण्याची मागणी करण्यात आली.
या जनसुनावणीला ग्रा. प. कढोली, जैरामपुर, मुधोली चक २, सोमनपल्ली, बहादुरपूर, चंदनखेडी (खर्डी) येथील सरपंच, उपसरपंच, सदस्य तथा ग्रामस्थांनी आपल्या मागण्या प्रशासनाला मांडल्या सर्व मागण्यांचे निराकरण करण्यासाठी लायड्स मेटल्स ॲन्ड एनर्जी लिमिटेड ही कटीबद्ध असल्याची ग्वाही देण्यात आली आहे.