कडूस प्रकरणातील आरोपींना मोक्का अंतर्गत कारवाई करावी; आळंदी देवस्थानची मागणी…

दिनेश कुऱ्हाडे

 उपसंपादक

आळंदी : वारकरी संप्रदायातील महत्त्वाची असलेली आषाढी एकादशीच्या दिवशी खेड तालुक्यातील कडूस मध्ये बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या मदतीने अवैध कत्तलखान्यावर दुपारी १२च्या आसपास छापा टाकला असता तेथे गोहत्या केल्याचं दिसून आले, प्रति पंढपूर म्हणून ओळखले जाणारे खेड तालुक्यातील कडूस येथे माघ शुद्ध दशमी ते माघ शुद्ध पौर्णिमा असे सहा दिवस साक्षात भगवान पांडुरंग येतात, तसेच संत तुकाराम महाराजांच्या १४ टाळकऱ्यांपैकी एक कडूस गावचे आहे. अशा पवित्र ठिकाणी गोहत्या करण्यात आली या निषेधार्थ खेड तालुक्यातील अनेक गावांमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला होता, या प्रकरणातील आरोपींवर गोमातांची हेतू पुर्वक कत्तल केली असून त्यामुळे हिंदू धर्मियांच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत सदर प्रकरणी गुन्हेगारांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात यावी अशी मागणी संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीच्या वतीने प्रमुख विश्वस्त योगेश देसाई यांनी पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक यांना निवेदन देऊन केली आहे.

       याप्रकरणी संबंधित व्यक्तीवर धार्मिक भावना दुखावल्या बद्दल भा.द.वि कलम २९५ (अ) महाराष्ट्र प्राणी रक्षण अधिनियम (गोवंश हत्या बंदी) कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे गुन्हे वारंवार करणाऱ्या गुन्हेगारांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात यावी अशी मागणी आळंदी देवस्थान केली आहे.