पोलिस स्टेशन सिंदेवाही तर्फे इफ्तार पार्टीचे आयोजन…

अमान क़ुरैशी

जिल्हा प्रतिनिधि

दख़ल न्यूज़ भारत

 

सिंदेवाही : दिनांक 7/4/2024 रोज रविवारला पवित्र महिना रमजान निमित्ताने तालुक्यातील विविध ठिकाणी पोलिस प्रशासन च्या वतीने रोजा इफ्तारचे कार्यक्रम आयोजित केले.

         सिंदेवाही शहराअंतर्गत पोलिस ठाण्याच्या वतीने वेगवेगळ्या ठिकाणी मुस्लिम बांधवांसाठी रोजा इफ्तार पार्टीचे रविवारी सायंकाळी आयोजन करण्यात आले होते. या वेळी शहरातील मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

            सध्या मुस्लिम समाज बांधवांचा पवित्र रमजान महिना सुरू असून एकात्मता, भाईचारा या भूमिकेतून सिंदेवाही पोलिस ठाण्याच्या वतीने रविवारला रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले.

            पोलिस निरीक्षक तुषार चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सिंदेवाही पोलिस ठाण्याच्या वतीने मुस्लिम बांधवांसाठी रोजा इफ्तार हा कार्यक्रम सायंकाळी जामा मस्जिद येथे आयोजित केला होता. सिंदेवाही पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक तुषार चव्हाण पी एस आई सागर महल्ले यांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता. 

            यावेळी जामा मस्जिद कमेटी चे अध्यक्ष चांद शेख, सेक्रेटरी रहीम खान, मेंबर कदीर पठान, फजल शेख, माजी सेक्रटरी नासिर अंसारी सर, नगरसेवक यूनुस शेख, माजी सरपंच राजू शेख, सामाजिक कार्यकर्ते सुभान पठान, नोमान पटेल, आदिल शेख,आसिफ क़ुरैशी,सहजाद शेख, अमान क़ुरैशी गुलाम हुसैन जावेद पठान सम्मी कुरेशी वसीम शेख राष्ट्रवादी अल्पसंख्याक अध्यक्ष सलीम खा पठान, व अन्य मान्यवर, तसेच सिंदेवाही पोलिस ठाण्याचे नवनियुक्त पोलिस अधिकारी अतुल स्थूल पी एस आई नेरलावार पोलिस कर्मचारी रणधीर मदारे यावेळी उपस्थित होते.