प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सभेकरिता फुटपाथ दुकानदाराना बेरोजगार करणार का ?   — कन्हान हॉकर्स युनियन,कन्हान कृती समिती व्दारे पत्रकार परिषदेत आरोप.  — ई-मेल द्वारा जिल्हाधिकारी नागपूर,तहसीलदार पारशिवनी, मुख्याधिकारी तथा ठाणेदार पारशिवनी यांना अवमान नोटीस..

     कमलसिंह यादव

तालुका प्रतिनिधी पारशिवनी

     पारशिवनी / कन्हान : – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेकरिता ग्रोमोर वेंचर प्रा.लि. (पूर्वीची हिंदुस्थान लिव्हर कंपनी) ची जमीन समतल केल्यामुळे कन्हान नगरपरिषद प्रशासनाने कंपनीच्या भिंतीलगत असलेल्या छोट्या दुकानदारांना अतिक्रमण काढण्याची नोटीस दिल्याने खळबळ उडाली आहे.

         हे दुकानदार बेरोजगार होऊन त्यांच्या परिवाराचा उदरनिवाहाचा प्रश्न उभा ठाकल्याने कन्हान हॉकर्स युनियन,कन्हान कृती समिती व्दारे पत्रकार परिषदेत दुकाने न हटवुन न्याय मिळण्याची मागणी केली आहे. 

            ब्रुक बाँडच्या कम्पनीच्या भिती लागत मागिल ३० ते ३५ वर्षापासुन दुकान लावुन दुकानदार छोटे व्यवसाय करित आहेत.दिनांक २०/०६/२०२० कन्हान नगरपरिषदेने या दुकानदाराना सुचना पत्र देऊन आपण अवैधरित्या येथे दुकान लावले असुन लवकरात लवकर लावलेले दुकान स्वः खर्च्याने हटविण्याची कार्यवाही करावी. 

        या नोटीसाचा आधार घेत दुकानदारानी उच्च नायालयात धाव घेतली असता तेथुन जैसे थे (स्टे) मिळालेला होता.त्यानंतर दुकाना मागे असले ली ब्रुक बाँडचि जागा ही ग्रोमोर वेंचर द्वारे खरेदी करण्यात आली.ग्रोमोर वेंचरच्या मालकाला आपल्याला मनमरजेची किंमत मिळण्याकरिता आमच्या दुकाना मुळे अडचण निर्माण होत असल्याने आम्हाला हटवायचे कसे?तो विचार करू लागले आहे. 

        लोकसभेच्या निवडणुका घोषित झाल्यानंतर भारताचे पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदी यांची सभा घेण्याआड सुरक्षेचा दृष्टिकोनाचा बहाणा करून आमचा काटा काढण्याचा त्यांनी ठरविले असावे.

        यामुळे (दि.०४) एप्रिल २०२४ ला पुन्हा आम्हाला मा. उच्च न्यायालयाचे स्टे असुन सुद्धा कंटेम्पट ऑफ कोर्ट ची कार्यवाहीची परवाह न करता कन्हान नगरपरिषद मुख्याधिकारी यांनी पुन्हा नोटीस बजावुन ३ तासाचा आत आपण केलेले अतिक्रमण हटवावे,तसे न केल्यास शासनाला लागणारा पैसा आपल्या कडुन वसुल करण्यात येईल असे नोटीस मध्ये स्पष्ट उल्लेख आहे.

        प्रकरणाची दखल घेऊन वकिलांनी आम्हाला मा.उच्च नायालयाकडुन स्टे मिळवुन दिला होता. त्यांनी कंटेम्पट ऑफ कोर्ट केल्याचे नोटीस कन्हान नगरपरिषद,पोलीस निरीक्षक पोस्टे कन्हान,तहसिल कार्यालय पारशिवनी,जिल्हाधिकारी कार्यालय नागपुर यांना ईमेल वर नोटीस पाठविण्यात आला असुन सुद्धा आजही नगरपरिषद प्रशासन ह्याच प्रयत्नात आहेत कि गोमोरे वेंचरच्या व्यावसायिकांना कसा फायदा प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रित्या कसा व्हावा याचीच योजना आखली जात आहे.  

             दुकानदारांनी मुख्याधिकाऱ्यांची भेट घेऊन न्यायालयाचा आदेश मांडला. यानंतर सभेसाठी याचि काकर्त्याची २५ दुकाने वगळता सर्व दुकाने तात्पुरत्या स्वरूपात हटविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.मात्र सभेसाठी कोणाची दुकाने काढली जाणार, सभेनंतर त्याच ठिकाणी दुकाने थाटण्याची जबाबदारी कोणाची ? हे संशयास्पद आहे.

        त्यामुळे कोणाची दुकाने काढ ली जाणार याबाबत दुकानदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. बैठकीनंतर ग्रोमोर कंपनीचे लोक या दुका नदारांना त्या जागेवर दुकाने थाटायला देणार की नाही ? नवीन पोलीस स्टेशन प्रशासकीय इमारत आणि न.प.नविन इमारतीला दुकानांच्या अतिक्रमणांनी वेढले असतानाही त्यांना कोणतीही नोटीस देण्यात आलेली नाही. यामुळे खळबळ उडाली आहे.

          हे दुकानदार बेरोजगार होऊन त्यांच्या परिवाराचा उदरनिवाहाचा प्रश्न उभा ठाकल्याने कन्हान हॉकर्स युनियन कन्हान कृती समिती व्दारे पत्रकार परिषदेत दुकाने न हटवुन न्याय मिळण्याची मागणी केली आहे. 

प्रतिक्रिया –

             नगरपरिषद कन्हान-पिपरी अंतर्गत राष्ट्रीय महामार्गाच्या एका कडेला २५-३० वर्षा पासुन अति क्रमण करून दुकाने बनवले आहे. त्यांची न्यायालयीन प्रक्रिया सुरू असल्याने प्रशासन यात हस्तक्षेप करणार नाही. सध्या कसल्याही सुचना वरून आलेल्या नाहीत.

मुख्याधिकारी – श्री रविंद्र श्रीराम राऊत 

            पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेच्या सुरक्षेसाठी फुटपाथवर असलेले दुकानदारांना स्व:ताखाली करण्यास सांगितले आहे. फुटपाथवरील दुकानदारांचे प्रकरण न्यायलयीन असल्याने प्रशासन हस्तक्षेप करणार नाही.या व्यतिरिक्त लोकांना ये जा करण्या करिता होम पाईप कंपनीचा पंटगणातुन व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच बस स्थानकापासुन मोकळ या जागेवर गेटची व्यवस्था करण्यात आली आहे.

पोलीस निरीक्षक उमेश पाटील