आरोग्य हीच खरी संपत्ती :- डॉ. सुवर्ण जवंजाळ

युवराज डोंगरे 

खल्लार/प्रतिनिधी

छत्रपती शिवाजी कला महाविद्यालय आसेगाव पूर्णा येथे शारीरिक शिक्षण विभाग, गृह अर्थशास्त्र विभाग व रेड रिबन यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक आरोग्य दिन संपन्न झाला. याप्रसंगी महाविद्यालयातील विद्यार्थी व कर्मचारी यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. या कार्यक्रमासाठी तज्ञ म्हणून श्री विशाल भोबे प्रयोगशाळा तंत्रज्ञ आयसीटीसी ग्रामीण रुग्णालय चांदूरबाजार, श्री प्रफुल इंदुरकर प्रयोगशाळा तंत्रज्ञ, कु. जया धांडे, श्री नितेश डहाके उपस्थित होते. या कार्यक्रमाचे संचालक डॉ. हरीश काळे व प्रास्ताविक डॉ. सुवर्ण जंवंजाळ यांनी केले या प्रकरणांमध्ये जवळपास 100 विद्यार्थी व कर्मचारी यांनी आपल्या आरोग्याची तपासणी करण्यात आली.