भिसी मध्ये राजकीय वातावरण तापणार आणि ढवळून निघणार? — धनराज मुंगले,किशोर मुंगले,अरविंद रेवतकर,शिध्दार्थ चहांदे,राजकीय घडामोडीत माहेर… — बसपा काय करणार? — मतदारांचे अधिकार…

प्रदीप रामटेके

मुख्य संपादक

      भिसीला अजून पर्यंत तालुक्याचा दर्जा प्राप्त झालेला नाही.यामुळे शासन स्तरावरून भिसीला इतर तालुका स्तरीय महत्वपूर्ण कार्यालये मंजूर करण्याचा प्रश्नच नाही.

      तद्वतच ग्रामपंचायत वरुन नगरपंचायत करण्याचे राजकारण महाराष्ट्र राज्यात सुरु आहे.मात्र नगरपंचायत किंवा नगरपरिषद झाल्यानंतर ग्रामपंचायत स्तरावर जी कामे केल्या जायची त्यातील काही कामांचा,कार्याचा व कर्तव्याचा विस्तार होतो आहे आणि काही योजना बंद होत त्या योजणातंर्गत नागरिकांना लाभ मुक्त केल्या जातो असा नगरपंचायत प्रक्रियेचा प्रकार.. 

          नगरपंचायत म्हटले की विविध बाह्य कामासाठी जादा निधी शासनाकडून येणे व जादा कराच्या माध्यमातून नागरिकांचे खिसे खाली करणे होय. 

           दिसत नसले तरी ग्रामीण भागातील स्थानिक राजकारण नेहमी तापलेले असते.यातून भिसी नगरपंचायत सुटूच शकत नाही.

      काॅंग्रेसचे राज्यस्तरीय ओबीसी सेलचे पदाधिकारी धनराज मुंगले यांना भिसीमध्ये स्वतःचे व काॅंग्रेस पक्षाचे अस्तित्व कायम राखण्यासाठी सातत्याने जागरूक व सतर्क राहावे लागेल आणि जनसंपर्कातंर्गत लोकहिताचे कार्ये अखंडितपणे सुरु ठेवावी लागतील असे दिसते आहे.त्यांच्यासाठी भिसी नगरपंचायत भेदने अवघड असल्याचे चिन्हे आहेत.

     भाजपा सत्तापक्षाचे आमदार चिमूर विधानसभा निर्वाचन क्षेत्रातंर्गत असल्याने भाजपाचे किशोर मुंगले व इतर पदाधिकारी भिसीमध्ये सध्यासाठी जम बसवून आहेत.विविध योजनातंर्गत गाव कामासाठी येणारा स्थानिक निधी हा त्यांचा मजबूती साठी आधार आहे.मात्र कार्यक्रम सोडले तर लोक कल्याणासाठी महत्वपूर्ण कामे,कार्ये त्यांच्या कडून आशादायक नाही.

      भिसीचे माजी सरपंच तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा पदाधिकारी अरविंद रेवतकर हे कुशल संघटक आहेत व आपल्या मधूर स्वभावाने स्थानिक नागरिकांच्या जवळ आहेत.मात्र ते काॅंग्रेस मधून राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये गेल्याने त्यांची लोक किंवा मतदार शक्ती काय आहे हे नगरपंचायत निवडणुकीत दिसून येईल किंवा इतर निवडणूक अंतर्गत लक्षात येईल.

       वंचितचे शिध्दार्थ चहांदे हे राजकीय खेळीमध्ये माहेर आहेत.परंतू सामाजिक कार्याला महत्व देत त्यांनी राजकीय घडामोडी कडे दुर्लक्ष केल्याने ते नगरपंचायत निवडणुकीला कोणत्या भुमिकाने पुढे येतात यावर त्यांचा कार्य मजबूतीचा उजाळा असेल.

       एकेकाळी भिसीमध्ये बहुजन समाज पार्टीचा दबदबा होता.आनंद भिमटे,धनराज भिमटे,यशवंत भोयर आणि इतर मासबेस कार्यकर्त्यांनी भिसीचे राजकीय व सामाजिक वातावरण बदलवून टाकले होते.आज भिसीमध्ये बसपा नाम मात्र का झाली आहे?याचे चिंतन विधानसभा पदाधिकारी यांनी करायला पाहिजे.

       नगरपंचायत भिसीमध्ये एससी,एसटी,एनटी, समाजाकडे सुद्धा राजकीय पारडे बदलण्याची शक्ती आहे.मात्र ते आपली शक्ती योग्य दिशेने वळवणार काय?यावर त्यांच्या मतदार एकसंघाला महत्व असेल. 

         एकंदरीत आज भिसी मध्ये कोणत्या पक्षाचे राजकीय बलाबल आहे हे सांगणे अवघड आहे.

          नगरपंचायत भिसी अंतर्गत मतदारांच्या शक्तीचा व कौलाचा अंदाज बांधणे या काळात शक्य नाही.यामुळे मतदार आपल्या मताधिकार अधिकाराला वेळेवरच उकल करणार असल्याचे पुढे आले आहे.