नागपूर येथील जगप्रसिद्ध हल्दीराम फुड इंटरनॅशनल लिमिटेड कंपनीच्या संचालकांवर फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्याचे जिल्हा सत्र न्यायालयाचे आदेश… — पॅकेट मध्ये दर्शविलेल्या वजना प्रमाणे माल राहात नसल्याचा मुद्दा..  — नागपूरच्या निलेश नागोलकर यांनी न्यायालयात न्यायप्रविष्ट केले होते प्रकरण..

 

डॉ.जगदीश वेन्नम

    संपादक

       हल्दीरामचे प्रोडक्ट म्हटले की,ग्राहकांचा आदम्य विश्वास.मात्र ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी काही टक्के माल फ्री देत असल्याचा बनवाबनवीचा प्रकार करीत याच हल्दीराम फुड इंटरनॅशनल लिमि.नागपुर कंपनीच्या संचालकांनी लाखो ग्राहकांची फसवणूक केली असल्याचा धक्कादायक घटनाक्रम नागपूर येथील निलेश नागोलकर यांनी पुराव्यानिशी उजेडात आणला होता व या संबंधाने त्यांनी जे.एम.एफ.सी.न्यायालय नागपूर येथे आर.सी.सी.२५४४ / २०११ ला क्रिमिनल केस दाखल केली होती.

          मात्र,नागपूर येथील जे.एम.एफ.सी.न्यायालयाने हल्दीराम फुड इंटरनॅशनल लिमिटेड नागपूरच्या बाजूने निकाल दिला.या निकालाच्या विरोधात जिल्हा सत्र न्यायालयात क्रिमनल रिविजन अपील दाखल केले.क्रिमिनल रिविजन अपीलचा क्रमांक ००००२८३/२०२२ असा आहे.

      अनेक कायदेशीर प्रक्रियांना सामोर जात तब्बल ११ वर्षांनंतर जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एस.एस.नागर यांनी सर्व साक्ष पुरावा अंतर्गत हल्दीराम फुड इंटरनॅशनल लिमिटेड नागपूरच्या कंपनी संचालकांच्या विरोधात न्यायनिवाडा ३ एप्रिल २०२३ ला दिला. 

     सदर न्याय निवाडा अंतर्गत हल्दीराम फुड इंटरनॅशनल लिमिटेड नागपूरच्या कंपनी संचालकांच्या विरोधात फौजदारी संहिता भांदवी ४२० अन्वये गुन्हा दाखल करण्याचे आदेश कनिष्ठ जे.एम.एफ.सी.न्यायालय नंबर ९ यांना दिला.

      हल्दीराम फुड इंटरनॅशनल लिमिटेड नागपूरच्या कंपनी संचालकांना वजन प्रमाणामध्ये हेराफेरी करून कमी पदार्थ देणे चांगलेच माहागात पडले असल्याचे जिल्हा सत्र न्यायालयाचा न्यायनिवाडा सांगून जातो आहे.