भाकपच्या ‘भाजपा हटाव देश बचाव’ जनजागरण मोहिमेला उस्फुर्त प्रतिसाद…

 

ऋषी सहारे 

संपादक

 

आरमोरी :-भारतीय कम्युनिस्ट पक्षाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनाचे औचित्य साधून दिनांक १४ एप्रिल ते दिनांक १५ मे २०२३ पर्यंत संपूर्ण देशात भाजप हटाव देश बचाव ही जनजागरण मोहीम राबविण्यात येत आहे. त्यानुषंगाने गडचिरोली जिल्ह्यातही ही जनजागरण मोहीम राबविण्यात आली. ह्या जनजागरण मोहिमेचे समर्थन काँग्रेस, अखिल भारतीय रिपबलिकन पक्ष, पिरीपा., बीआर एस पी,शेकाप, ह्या पक्षांनी केले. भाजप हटाव देश बचाव मोहिमेचा एक भाग म्हणून गडचिरोली येथील इंदिरा गांधी चौकात कार्नर सभा घेण्यात आली.

              भारतीय जनता पार्टी ह्या देशात मागील ९ वर्षात सत्तेत आल्यापासून त्यांनी देशात सर्व जनविरोधी, लोकशाहीविरोधी, संविधान विरोधी व अडाणी आणि अंबानी ह्यांच्याच हिताचे धोरणं राबविण्याच्या सपाटा लावलेला आहे. परिणामी ह्या देशात प्रचंड प्रमाणात महागाई वाढली आहे, नवीन रोजगार निर्मिती होण्या ऐवजी कामगार कपात केली जात आहे, अनेक शासकीय विभागात जागा रिक्त असताना नोकर भरती केली जात नाही. शेतीसाठी लागणारे खते, औषधे, बी बियाणे तसेच पेट्रोल, डिझेल व घरघुती गॅसच्या किमतीमध्ये प्रचंड वाढ केली. शेतकऱ्यांना हमीभाव दिलेला नाही. जाती जाती व धर्मा धर्मा मध्ये तेढ निर्माण करून धर्माचं राजकारण केले जात आहे. भाजपच्या कार्यकाळात महिलांवर सर्वात जास्त बलात्कार होत आहेत. गुन्हेगारी वाढलेली आहे. शिक्षणाचे खाजगीकरण करून गरिबांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचे षडयंत्र चालविले जात आहे. असंवैधानिक मार्गांचा व तपास यंत्रणांचा दुरुपयोग करून सरकार पाडली जात आहेत. म्हणून अशा भाजप सरकारला येणाऱ्या सर्व निवडणुकांत परास्त करण्यात यावे असे आवाहन ह्या सभेच्या माध्यमातून जनतेला करण्यात आले.

             ह्या सर्वपक्षीय सभेत कांग्रेस चे माजी आमदार, राज्य अध्यक्ष आदिवासी सेल डॉ नामदेव उसेंडी, रिपब्लिकन पक्ष चे रोहिदास राऊत ,बिआरएसपी चे जिल्हा प्रभारी राज बन्सोड ,पिरीपा‌चे जिल्हा अध्यक्ष‌ मुनेस्वर बोरकर , कांग्रेस शहर अध्यक्ष सतीश विधाते, शेकापचे अक्षय कोसनकर, अंधश्रद्धा निर्मुलन चे विलास निबोरकर , हंसराज उंदिरवाडे,भाकपा चे डाॅ.महेश कोपुलवार, जिल्हा सचिव देवराव चवळे ,अॅड. जगदिश मेश्राम,जलील पठान ,व अनेक कार्यकर्ते उपस्थित होते प्रास्ताविक काॅ.डॉ.महेश कोपूलवार, संचालन चुन्नीलाल मोटघरे आभार प्रदर्शन काॅ.देवराव चवळे यांनी केले.