सिध्दबेट आणि इंद्रायणी नदीचे पावित्र्य राखले पाहिजे : आमदार श्रीकांत भारतीय 

दिनेश कुऱ्हाडे

   प्रतिनिधी

आळंदी : संतभुमी अलंकापुरीत संत ज्ञानेश्वर आणि त्यांचे भावंडे यांचे अधिकाधिक वास्तव्य असलेले सिध्दबेटाचे आणि वारकऱ्यांची जननी असलेली इंद्रायणी नदी चे पावित्र्य जोपासण्यासाठी प्रयत्न केले जाईल असे आश्वासन विधानपरिषदेचे आमदार श्रीकांत भारतीय यांनी आळंदी येथे बोलताना दिले.

           भाजपचे आमदार श्रीकांत भारतीय यांना सिध्दबेटाची असलेली अवस्था यावर एक व्हिडिओ पाहायला मिळाला आणि त्यानंतर त्यांनी सिद्धबेटाची पाहणी करण्याचा निर्णय घेतला यावेळी त्यांनी सिद्धबेटाची संपूर्ण पाहणी करुन सिद्धबेटाची चाललेल्या कामांचा आणि पुढील होणाऱ्या कामांचा यावेळी प्रशासक वैशाली वाघमारे आणि मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांच्याकडून माहिती घेतली. 

       श्री क्षेत्र सिध्दबेट हे केळगाव हद्दीत असल्याने केळगावचा ही विकास व्हावा अशी मागणी यावेळी माजी उपसरपंच अमोल विरकर आणि किरण मुंगसे यांनी यावेळी श्रीकांत भारतीय यांच्याकडे केली.

         यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख, भाजपचे नेते डॉ.राम गावडे, हभप पुरुषोत्तम महाराज पाटील, आळंदी नगरपरीषदेचे माजी नगराध्यक्ष सचिन पाचुंदे, माजी उपनगराध्यक्ष सचिन गिलबिले, अशोकराव उमरगेकर, भाजपचे शहराध्यक्ष किरण येळवंडे, संतोष गावडे, वासुदेव मुंगसे, भागवत आवटे, माऊली बनसोडे, आकाश जोशी, प्रमोद बाफना, भागवत काटकर, सदाशिव साखरे, मंगल हुंडारे आदी भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते.