विषय या चित्रपटाचे लवकरचं शूटिंग सुरू…. — बुद्ध पौर्णिमेनिमित्त दिग्दर्शक भूषण सरदार यांची घोषणा…

 

रत्नदिप तंतरपाळे/चांदूर बाजार तालूका प्रतिनिधी

      सामाजिक विषयावर आधारित व रस्त्यावरील अनाथ मुलासबंधी त्यांच्या जीवनावर आधारित विषय हा चित्रपट ( लघुपट ) याची लवकरचं शूटिंग सुरू करू अशी दिग्दर्शक भूषण सरदार यांनी बुद्ध पौर्णिमेला घोषणा केली.

      यामध्ये मुख्य कलाकार अभिनेता म्हणून विश्वजीत सरदार यांची निवड करण्यात आली आहे. तर मुख्य अभिनेत्री म्हणून रिया हजारे यांची निवड करण्यात आलेली आहे. 

      यामध्ये रोशन सरदार, प्रतिक गोले यांची खलनायक म्हणून निवड करण्यात आली आहे. तसेच समीक्षा गोले, रोहित सरदार, शिवानी चिखलकर, स्वाती सरदार, गुरुदेव इडपाचे ,राजू कासदेकर, आदित्य गोले, स्वप्नील निर्गुळे, शिवानी नितनवरे, ओम केवट, पंकज पाटणकर, विजय उके, सुमेधा वरघट, अमन कासदेकर आदिनाथ गुरकुले ,आर्यमेघ सरदार , रोहित, तनवी, वैभव , प्रकाश अंभोरे इत्यादी अनेक, कलाकारांची निवड करण्यात आलेली आहे.

      हा एक आगळा वेगळा लघुपट आम्ही घेऊन येणार आहोत.देशातील वास्तव लोकांना माहित व्हावं,समाजिक समस्या लोकांना माहित व्हाव्या यांसाठी सर्व विषय चित्रपटाची टीम काम करत आहे. 

     लवकरचं सर्वांच्या भेटीला विषय नावाचा चित्रपट येणार आहे. तसेच हा लघुपट youtube चॅनेल वर प्रदर्शित केल्या जाईल.