नवजीवन (सीबीएसई) मध्ये रविंद्रनाथ टागोर यांची जंयती साजरी…

 

नागपूर विभागीय प्रतिनिधी-ऋग्वेद येवले

           साकोली -नवजीवन कॉन्व्हेंट एंड इंग्लिश प्राय. स्कूल (सीबीएसई) साकोली येथे गुरूदेव रविंद्रनाथ टागोर जयंतीचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य मुजम्मिल सय्यद, पर्यवेक्षिका शर्मिला कछवाह, वरिष्ठ शिक्षिका भारती व्यास व प्रशासन अधिकारी विनोद किरपान उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरवात गुरूदेव रविंद्रनाथ टागोर यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करून करण्यात आली.

          यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना प्राचार्य मुज्जमिल सय्यद यांनी रविंदनाथ टागोर यांच्या विषयी माहितीत सांगीतले की, ते एक महान कवि, देशभक्त, कादंबरीकार, संगीतकार, मानवतावादी व चित्रकार होते. तसेच ते भारताचे व आशियातील साहित्यासाठी पहिले नोबेल विजेते होते. जन गण मन व आमार शोनार बांग्ला हे भारत व बांग्लादेश यांच्या राष्ट्रगीताचे जनकत्व असलेले गुरूदेव हे पृथ्वीवरील एकमेव कवी होते.

         कार्यक्रमाचे संचालन सुनिता बडोले यांनी केले तर आभार प्रदर्शन हेमलता कुमार यांनी मानले. या कार्यक्रमाकरीता शाळेतील शिक्षकगण व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.