बु. रामरावजी खंडारे बहुद्देशीय समाज विकास संस्था,उपराई येथे शाहू महाराज पुण्यतिथी….

 

युवराज डोंगरे 

खल्लार प्रतिनिधी

         सर्वसामान्य बहुजन समाजाला स्वाभिमानाचे नवे जीवन देणारे, आरक्षणाचे प्रणेते राजर्षी शाहू महाराज यांची 100 वी पुण्यतिथी निमित्त बु रामरावजी खंडारे बहूउद्देशीय समाज विकास संस्थेत आदरांजली अर्पण केली.

         या वर्षी राजर्षी शाहू महाराज पुण्यतिथी निमित्त “स्मृती-शताब्दी पर्व” निमित्त संस्था पदाधिकाऱ्यांनी राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून 100 सेकंद स्तब्ध राहून श्रद्धांजली अर्पण केली तसेच संस्था अध्यक्ष राहुल एस. खंडारे यांनी त्यांच्या भाषणातून महाराजांच्या जीवनातील वेदोक्त व पुरानोक्त प्रसंगा बाबत माहिती दिली. तसेच राज्यांची ख्याती म्हणजे “जो कुणी आपल्या मुलांना शाळेत पाठविनार नाही. त्याला १ रूपया दंड ठोठावणारा पहिला राजा म्हणजे राजर्षी शाहू महाराज होय” असे महाराजांचे शिक्षनाविषयी प्रेम आपल्याला दिसून येते.याबाबत माहिती देण्यात आली व कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सौ.के. बी. खंडारे यांनी केले.आणि कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.कार्यक्रमाला सर्व पदाधिकारी उपस्थित होते.