टाकळी टें येथे आज निकाली कुस्त्याचे जंगी मैदान, हजारो नामांकित पैलवानांची उपस्थिती… — कैलासवासी वस्ताद झुंजार सोलनकर यांच्या पाचवे पुण्यस्मरणा निमित्त आज निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान विद्यालयाच्या प्रांगणात…

  बाळासाहेब सुतार

निरा नरसिंहपुर प्रतिनिधी

        टाकळी तालुका माढा येथे निकाली कुस्त्याचे मैदान आज रविवार दिनांक 7 रोजी दुपारी 3 वाजता भरविण्यात येणार.तर राज्य व राज्याबाहेरून आनेक कुस्ती मल्ल पैलवान व प्रेक्षकांची 5 हजाराहून अधिक संख्येने उपस्थित राहणार.

         संयोजक कैलासवासी झुंजार देवराव सोलनकर कुस्ती उत्सव कमिटी टाकळी, व सोलनकर परीवार यांच्या संयुक्त विद्यमाने, व माननीय श्री हिम्मतभाऊ सोलनकर , मा.संचालक साखर कारखाना माढा, प्रसिद्धी व्यक्तिमत्व, जगदाळे परिवाराचे मित्र, टाकळी गावचा जाणता राजा यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली, सालाबाद प्रमाणे कैलासवासी वस्ताद झुंजार सोलनकर यांच्या पाचवे पुण्यस्मरणा निमित्त निकाली कुस्त्याचे जंगी मैदान आज रविवार दिनांक 7/ 4 /2024 दुपारी 3 वाजता भरविण्यात येणार आहे.

        महाराष्ट्र राज्य व राज्या बाहेरूनही कुस्ती मल्ल पैलवान मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत तसेच सोलापूर, सांगली, कोल्हापूर, पुणे, सातारा, उस्मानाबाद, आशा आनेक जिल्ह्यातू नामांकित कुस्तीमल्ल पैलवानांची हजारोच्या संख्येने उपस्थित राहणार, टाकळी येथील कुस्ती उत्सव कमिटीच्या वतीने सांगण्यात आले. तसेच या ठिकाणी विशेष सन्मान व सत्कारही करण्यात येणार आहेत.

          टाकळी येथील निकाली कुस्त्याच्या निवेदनासाठी, संपूर्ण राज्यामध्ये ओळख निर्माण झालेले श्री पैलवान युवराज (तात्या) केचे यांची या कुस्ती आखाड्यासाठी प्रमुख निवेदक म्हणून उपस्थित आहे.