गरिबांच्या हितासाठी व बहुजन महापुरुषांच्या विचारधारेवर कार्य करणारा देशातील एकमेव पक्ष बसपा :- प्रा. योगेश गोन्नाडे — सिरोंचा तालुक्यातील जाफ्राबाद येथे उमेदवारानी घेतली कार्यकर्त्यांची भेट…

भाविक करमनकर 

धानोरा तालुका प्रतिनिधि 

        गडचिरोली – चिमूर लोकसभा निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने आज बहुजन समाज पार्टी गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी विधानसभा सिरोंचा तालुक्यातील जाफ्राबाद येथे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची धावती भेट घेतली.

        या बैठकीत प्रा. योगेश नामदेवराव गोन्नाडे हे बसपा गडचिरोली – चिमुर लोकसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार यानी बैठकीत पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.

         यावेळी त्यांनी बहुजन समाज पार्टी ही देशातील गरिबांच्या हितासाठी व बहुजन महापुरुषांच्या विचारधारेवर कार्य करणारी एकमेव पक्ष असल्याचे मत व्यक्त केले. बहुजन समाज पार्टीची सत्ता केंद्रात आल्यास केवळ कार्पोरेट क्षेत्र व काही पूंजीपत्ती लोकांचाच विकास न करता समाजातील आर्थिक विषमता दूर करून गोर – गरीब जनतेचा सर्वांगीण विकास करण्याची ताकद असल्याचा विश्वास व्यक्त केला. 

       बैठक दरम्यान गोन्नाडे यांनी म्हटले की येत्या १९ तारखेला पार पडणाऱ्या लोकसभा निवडणुकीत बहुजन समाज पक्षाला प्रचंड बहुमताने निवडून आणण्याच्या दृष्टीने सर्व कार्यकर्ते तथा पदाधिकारी मंडळींना निवडणुकीसाठी सज्ज होण्याचे संदेश देण्यात आले.

         यावेळी शंकर बोरकुट जिल्हाध्यक्ष बसपा, धारणे उपाध्यक्ष बसपा, मनोहर कावेरी , सत्यम कुम्मरी, बानाया दुर्गम व्येकटी बोरकुटे व इतर पदाधिकारी व कार्यकर्ते आणि महिला उपस्थित होते.