सर्वांगीण विकासासाठी खेळ आवश्यक- सुनील फुंडे… — साकोली येथे १६ वर्ष मुला मुलींचे विभागीय व्हॉलीबॉल सामने…

    ऋग्वेद येवले

नागपूर विभागीय प्रतिनिधी 

साकोली -शालेय जीवनात विद्यार्थ्यांना खेळाची आवड निर्माण व्हावी यासाठी शिक्षक, विद्यार्थी यांनी तयार राहावे कारण विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास करायचा असेल तर त्याला खेळणे आवश्यक आहे असे प्रतिपादन भंडारा जिल्हा वॉलीबॉल असोसिएशनचे अध्यक्ष सुनील भाऊ फुंडे यांनी केले.

           साकोली येथील तालुका क्रीडा संकुल च्या वॉलीबॉल केंद्रावर महाराष्ट्र राज्य व्हॉलीबॉल असोसिएशन व भंडारा जिल्हा व्हॉलीबॉल असोसिएशन तर्फे १६ वर्षाखालील मुला- मुलींचे विभागीय व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. स्पर्धेचे उद्घाटक म्हणून मा. आमदार बाळा काशीवार महाराष्ट्र व्हॉलीबॉल संघटनेचे कोषाध्यक्ष अरविंद गवई ,राष्ट्रीय पंच सौरभ रोकडे, विभागीय सचिव एस ए वहाब, जिल्हा वॉलीबॉल संघटनेचे सचिव शाहेद कुरैशी व नागपूर विभागातील चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, वर्धा, गोंदिया ,भंडारा येथील मुला- मुलींचे संघ व त्यांचे संघ व्यवस्थापक उपस्थित होते.

             उद्घाटनाप्रसंगी आमदार बाळा काशीवार यांनी सांगितले की, खेळाडूंनी खेळाडू वृत्तीने खेळाचे प्रदर्शन करावे सर्व जिल्ह्यातून निवड होऊन आलेले खेळाडूंचे त्यांनी अभिनंदन केले. विभागीय सचिव वहाब यांनी सांगितले की, जिल्ह्यातून निवड झालेले खेळाडू विभागात खेळतात आणि विभागातून एक संघ तयार होऊन तो राज्यस्तरीय स्पर्धेत सहभाग घेतो भंडारा जिल्हा वॉलीबॉल संघटनेला अजून मोठ्या स्पर्धा आयोजनाविषयी त्यांनी मार्गदर्शन केले व संघटनेचे सचिव शाहेद कुरेशी यांनी याप्रसंगी उपस्थित यांचे अभिनंदन व आभार मानले.

         विद्यार्थ्यांना शालेय जीवनात खेळांची आवड निर्माण व्हावी यासाठी अशा जिल्हा, विभागीय स्पर्धांचे आयोजन होणे फार आवश्यक आहे, सहभागी विद्यार्थ्यांना दहावीच्या परीक्षेत क्रीडा गुण सवलतही मिळते असे त्यांनी सांगितले. या स्पर्धेत मुला -मुलींच्या संघात नागपूर जिल्हा प्रथम क्रमांक व वर्धा जिल्हा द्वितीय क्रमांकाने विजय झाला. भंडारा चंद्रपूर व गडचिरोलीच्या संघांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करीत, राज्यस्तरीय स्पर्धेसाठी प्रत्येक जिल्ह्यातून उत्कृष्ट खेळाडूंची निवड करण्यात आली.सहा जिल्ह्यातून जवळपास दीडशे खेळाडूंची उपस्थिती स्पर्धेला होती.

         संपूर्ण स्पर्धेचे नियोजन भंडारा जिल्हा व व्हॉलीबॉल संघटनेचे अध्यक्ष सुनीलभाऊ फुंडे यांच्यातर्फे करण्यात आली होती. स्पर्धेदरम्यान रवी अग्रवाल, किशोर पोगळे, लखन बर्वे, अरुण बडोले, फजील खान, साकोली येथील वॉलीबॉल प्रेमी प्रामुख्याने उपस्थित होते.

             क्रीडा संकुल चे वॉलीबॉल केंद्रातील सुसज्ज मैदान वन स्टेप फॉर वॉलीबॉल क्लबच्या खेळाडूंनी आकर्षक रित्या तयार केले होते. विभागीय स्पर्धेचे पंच म्हणून वसीम पठान, गगन खोब्रागडे, आर्यन टेंभुर्णे, पियुष बांगरे, अनिकेत नागोसे, रोहित मरसकोल्हे, रुपेश चिरवतकर, युवराज बोबडे, कु. सुहानी ठाकरे यांनी उत्कृष्ट रित्या जबाबदारी पार पाडली.

          बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमाला महाराष्ट्र व्हॉलीबॉल संघटनेचे पदाधिकारी जिल्हा संघटनेचे सचिव शाहेद कुरेशी उपस्थित होते. विजयी संघांना स्मृतीचिन्ह व पंचांना ही भंडारा जिल्हा वॉलीबॉल असोसिएशन तर्फे स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. स्पर्धेचे आभार राष्ट्रीय पंच सौरभ रोकडे यांनी मानले.