जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना पुस्तक वितरित करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन… — बसपा जिल्हा प्रभारी प्रदीप जी खोब्रागडे यांच्याकडून विद्यार्थ्याना पुस्तक वितरित…

अश्विन बोदेले

 जिल्हा प्रतिनिधी

  दखल न्यूज भारत

वैरागड :- येथील जिल्हा परिषद मुला मुलींची शाळा वैरागड येथे दिनांक 6 डिसेंबर 2023 रोजी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव, बोधिसत्व, परमपूज्य, विश्वरत्न, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी बसपा जिल्हा प्रभारी प्रदीप जी खोब्रागडे यांच्याकडून शाळेतील विद्यार्थ्यांना पुस्तक वितरित करून अभिवादन करण्यात आले.

          विद्यार्थ्यांना पुस्तक वाटप करून महामानव भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली अर्पण करण्यात आली.

        यावेळी या कार्यक्रमाला कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून श्री बांबोळे सर तर मुख्य तिथी म्हणून प्रदीप जी खोब्रागडे जिल्हा प्रभारी बसपा, प्रमुख उपस्थिती म्हणून कुंमरे सर, श्रीमती मडावी मॅडम हे उपस्थित होते.

          यावेळी प्रमुख मार्गदर्शन करताना प्रदीपजी खोब्रागडे यांनी विशेष करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे शैक्षणिक विचार काय आहेत. याविषयी सखोल मार्गदर्शन केले.

         मागासवर्गीयांच्या शिक्षणासंदर्भात बाबासाहेबांनी जे चिंतन केले तेही तितकेच मूलगामी स्वरूपाचे आहे. ज्ञानाअभावी व्यक्ती ‌आणि समाजाचे नुकसान जसे होते, तसेच एखादी व्यक्ती वा समूहाला शिक्षण नाकारणे म्हणजे माणूस म्हणून त्याचे अस्तित्व नाकारून त्याच्या क्षमता मारून टाकणे होय, अशी बाबासाहेबांची शिक्षणविषयक धारणा होती.

         – बाबासाहेबांना उच्चशिक्षणाद्वारे समता, स्वातंत्र्य, बंधुभाव ही मानवी मूल्ये स्वीकारलेला एक स्वाभिमानी आधुनिक समाज निर्माण करायचा होता. बाबासाहेबांच्या शैक्षणिक चळवळीचा हाच खरा मूलाधार होता.

         – सर्व सामाजिक दुखण्यावर उच्चशिक्षण हेच एकमेव औषध आहे, असे डॉ. आंबेडकरांनी एका सभेत म्हटले होते.

          – बाबासाहेबांनी स्वातंत्र्यपूर्व भारत सरकारकडून मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी ३ लाख रुपयांचा निधी मिळविला होता. परिणामी बऱ्याच विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळू लागली होती.

         – शिक्षक हा शालेय असो, महाविद्यालयीन असो की विद्यापीठीय असो त्याचे कर्तृत्त्व उत्तुंग आणि विद्यार्थ्यांना अनुकरणीय वाटले पाहिजे, असे ते शिक्षकांविषयी बोलत.

     – शिक्षण हाच जीवनाच्या प्रगतीचा मार्ग आहे हे जाणून विद्यार्थ्यांनी भरपूर अभ्यास करावा आणि समाजाचे विश्वासू नेते बनावे, असे डॉ. आंबेडकर म्हणायचे.

          अशाप्रकारे विद्यार्थ्यांना बाबासाहेबांचे शैक्षणिक असा कार्य विषयी व विचारांविषयी माहिती देऊन त्या पद्धतीने विद्यार्थ्यांनी उद्युक्त होऊन आपल्या जीवनात बदल घडवून आणून एक सुजाण नागरिक स्वतः घडून देशाला घडविण्यात सक्षम पणा निर्माण करावा. असे विद्यार्थ्यांना आवाहन केले.