नंदलाल पाटील कापगते विद्यालय साकोली येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिन साजरा…

    ऋग्वेद येवले

नागपूर विभागीय प्रतिनिधी

       साकोली:नंदलाल पाटील कापगते विद्यालय तथा कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय साकोली येथे “शिक्षण हे वाघिणीची दूध आहे ते जो प्रासंग करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही” अशी सिंहगर्जना करणारे विश्ववंदनीय, महामानव, युगपुरुष, युगप्रवर्तक भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा 67 वा महापरिनिर्वाण दिन पार पडला. 

     कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक के. एस. डोये तर प्रमुख अतिथी आर बी कापगते मॅडम, प्राध्यापक बी पी बोरकर, प्रा. के.जी.लोथे, प्रा. स्वाती गहाणे ,आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त आर व्हि दिघोरे सर, एम एम कापगते व इतर मान्यवर उपस्थित होते. 

      कार्यक्रमाची सुरुवात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करून करण्यात आले. विद्यालयाचे मुख्याध्यापक के एस डोये यांनी मनोगत व्यक्त करताना म्हणाले की डॉक्टर बाबासाहेब हे खडतर जीवन जगत असताना त्यांना आलेल्या अनुभवातून शिक्षणाला किती महत्त्व आहे शिक्षणाने मनुष्य समृद्ध होतो माणसाचे विचार समृद्ध होतात शिक्षण हे समाजात बदल घडविण्याचे प्रभावी शस्त्र होऊ शकते असे मौलिक विचार यांनी ठेवले. 

   याप्रसंगी विद्यार्थ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन चरित्रावर आधारित गीत, भाषणे सादर केलेत. कार्यक्रमाचे संचालन आर. बी. कापगते सर यांनी तर आभार प्रदर्शन धनंजय तुमसरे सर यांनी केले. 

    कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी विद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.