महामहिम राष्ट्रपतींच्या हस्ते सुवर्णपदक स्वीकारताना अमित रामरतन गोहणे..‌

 

धानोरा /भाविक करमनकर 

 

  स्थानीक,

 श्री साईबाबा ग्रामीण विकास संस्था गडचिरोली द्वारा संचालित श्री जी सी पाटील मुनघाटे महाविद्यालयातील एम ए पदव्यूत्तर शाखेतील इतिहास विभागतून महाविद्यालयाचा विद्यार्थी अमित रामरतन गोहणे यांनी गोंडवाना विद्यापीठाद्वारा घेतलेल्या उन्हाळी 2021 च्या परीक्षेमध्ये गोंडवाना विद्यापीठातून एम.ए.च्या परीक्षेत सर्वप्रथम येण्याचा बहुमान प्राप्त केला.

               तसेच एम.ए.पदव्युत्तर शाखेमध्ये देखील इतिहास विषयात सर्वाधिक गुण घेऊन सर्वप्रथम स्थान प्राप्त केले.गोंडवाना विद्यापीठाच्या दहाव्या दीक्षांत समारंभामध्ये महामहीम राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते सुवर्णपदक देऊन त्याचा सन्मान करण्यात आला. 

            अमित गोहणे यांनी आपल्या यशाचे श्रेय महाविद्यालयाचे इतिहास विभाग प्रमुख प्रा.डॉ राजू किरमिरे यांना दिले.याप्रसंगी दीक्षांत समारंभ मंचावर महामहीम राज्यपाल रमेश बैस,केंद्रीय मंत्री ना.नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस,मागासवर्गीय आयोगाचे राष्ट्रीय अध्यक्ष व माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहिर,ना.सुधीर मुनगंटीवार,ना.चंद्रकांतदादा पाटील,ना.गावीत,कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे,प्र.कुलगुरू श्रीराम कावळे आदी मान्यवर उपस्थित होते.

            अमित रामरतन गोहणे यांनी पदव्यूत्तर शाखेमध्ये दोन सुवर्ण पदक पटकावले इतिहास विषयात विद्यापीठातून प्रथम येऊन महाविद्यालयाचे व संस्थेचे नाव लौकिक केले त्याबद्दल श्री. साईबाबा ग्रामीण विकास संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती शालिनीताई रमेशचंद्र मुनघाटे, श्रीमती आशी आशिष रोहनकर कार्याध्यक्षा,श्रीमती मीनल रिषी सहानी सचिव,सौरभदादा मुनघाटे सहसचिव तथा प्राचार्य डॉ पंकज चव्हाण यांनी त्याचे अभिनंदन व कौतुक केले तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वृंद तथा प्रशासकीय कर्मचारी वृंद आणि आईवडीलांसह परिसरातील सर्व आप्तस्वकीयांनी सुद्धा अभिनंदनाचा वर्षाव केला आणि भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा प्रदान केल्या.