शेतमालाच्या रक्षणासाठी,”रात्रोच्या वेळी, जागलीला गेलेल्या अंकुशला वाघाने केले ठार..

दिक्षा ललिता देवानंद कऱ्हाडे

              वृत्त संपादीका

          मुलभूत गरजा भागविण्यासाठी शेतकऱ्यांना जिव मुठीत ठेवून शेतमालाचे रक्षण करावे लागते.वन्य प्राणी असलेल्या वाघांमुळे शेतकऱ्यांचा बळी केव्हा जाईल याचा नेम नाही.

         रात्रोला शेतमालाचे रक्षण करण्यासाठी जागलीला गेलेल्या युवकांचे बाबतीत अशीच जिवघेणारी घटना रात्रोच्या वेळी घडली. 

          चिमूर तालुक्यातील मौजा खानगाव येथील अंकुश श्रावण खोब्रागडे हे स्व शेतात शेतमालाचे रक्षण करण्यासाठी नित्यनेमाने रात्रोच्यावेळी जायचे.

         वाघाला याचा अंदाज असावा,म्हणूनच वाघ शिकार करण्याच्या दृष्टीने अंकुश श्रावण खोब्रागडे यांच्या शेतालगत दबा धरून बसलेला असावा.

       अंकुश श्रावण खोब्रागडे हे रात्रोच्यावेळी शौचास गेले असता दबा धरून बसलेल्या वाघांनी त्यांच्यावर झडप घातली व ठार केले.आणि काही अंतरावर त्यांना नेऊन त्यांचे भक्षण केले.

           अंकुश सकाळी घरी परत न आल्याने त्यांचा शोध घेतला असता ते वाघाचे बळी ठरले असल्याचे पुढे आले.

        सदर घटनेची माहिती संबंधित वनविभागाच्या अधिकाऱ्यांना व शेगाव (बु.) पोलीस स्टेशन ठाणेदार यांना दिली.दोन्ही विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले व घटनेचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी चिमूर ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले.

        अंकुश श्रावण खोब्रागडे यांना बघण्यासाठी परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती.एका योग्य तरुणांचा नाहक बळी गेल्याने नागरिकांत हळहळ व्यक्त होत होती.