सिरोंचा येथे माजी जि.प.अध्यक्ष कंकडालवार यांचा वाढदिवस उत्साहात साजरा… — वाढदिवसानिमित्य रुग्णांना फळ वाटप व विध्यार्थ्यांना पाठ्यपुस्तक वितरण…

डॉ.जगदीश वेन्नम

  संपादक

सिरोंचा : आदिवासी विद्यार्थी संघा व अजयभाऊ मित्र परिवारचे नेते,गडचिरोली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा अहेरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अजयभाऊ कंकडालवार यांचे वाढदिवस सिरोंचा शहरात विविध कार्यक्रमांनी मोठ्या उत्साहात पार पडला.

     माजी जि.प.अध्यक्ष कंकडालवार यांचा वाढदिवस येथील ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळ वाटप तसेच येथील जिल्हा परिषद मुलांची व कन्या शाळेतील विद्यार्थी व विद्यार्थिनींना नोटबुक व पेन वितरण करून तसेच अंगणवाडी केंद्रातील चिमुकल्याना चॉकलेट वाटून साजरा करण्यात आले.

       ग्रामीण रुग्णालयात फळ वाटपाचे कार्यक्रमाची शुभारंभ येथे नव्याने रुजू झालेले वैद्यकीय अधिक्षक डॉ.किरणकुमार वाघमारे व वैधकीय अधिकारी डॉ.अश्विन वलके यांच्या हस्ते करण्यात आले तर विध्यार्थ्यांना नोटबुक व पेन वितरणाचे शुभारंभ शाळेची मुख्यद्यापिका बी.आर.नैताम मॅडम याच्या हस्ते करण्यात आला.

      माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांचे वाढदिवसाचे कार्यक्रम आदिवासी विद्यार्थी संघाचे ज्येष्ठ नेते व पेंटींपाका ग्राम पंचायतचे सदस्य सोमय्या गादे यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आली.यावेळी ग्रामीण रुग्णालयात डॉ.प्रवीण मडावी, मलेरिया तांत्रिक कक्षसेवक एस.एस.बोल्ले,कक्षसेवक एम.एस.तांदुळकर,औषधी निर्माता रमेश वेलादी,सुरक्षारक्षक एम.डी.बावनवाळे,प्रसाद बतुला,महेश पोक्कुरी तर जिल्हा परिषदेच्या दोन्ही शाळेत येथील शिक्षिका एस.आर.पस्पुनूरवार,अंगणवाडी सेविका बानू बंदेला,सायरा बानो, रामबाई कोठारी,किश्वर शेख,सुमन तोकला,माधवी मादरबोईना आदी उपस्थित होते.

      माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांचा वाढदिवस कार्यक्रम यशस्वीतेसाठी आविस सल्लागार व माजी उपसरपंच रवी सल्लम,सिरोंचा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक नागराजु इंगीली,नारायणपूर ग्राम पंचायतीचे उपसरपंच अशोक हरी,ग्राम संवाद सरपंच संघटनेचे विभागीय अध्यक्ष किरणकुमार वेमुला,रवीभाऊ बोगोनी,सागर कोठारी,सडवली जंगम,शेखर पट्टेम,सुखदेव मुतूनूरी,माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या सोशल मीडिया समन्वयक संपत गोगुला सह आविस व अजयभाऊ मित्र परिवारचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.