सिंदेवाही पोलिस स्टेशन येथे रेखाटले ज्येष्ठ व्यंगचित्रकार आर.के.लक्ष्मण यांचे चित्र..

 

जिल्हा प्रतिनिधि:-अमान क़ुरैशी

दखल न्यूज भारत

 

चंद्रपुर-सिंदवाही:-

       ज्येष्ठ व्यंगचित्रकार पदमविभूषण पुरस्कार प्राप्त राशीपुरम कृष्णस्वामी लक्ष्मण म्हणजेच आर. के. लक्ष्मण यांचा जन्म 23 ऑक्टोबर 1924 या दिवशी म्हैसूर मध्ये झाला. त्यांनी अर्धशतक भर “टाइम्स ऑफ इंडिया ” मध्ये व्यंगचित्र रेखाटली. त्यांचे “कॉमन मॅन” हे व्यंगचित्र बरेच गाजले. आर. के. लक्ष्मण यांना सर्वसामान्य भारतीयांच्या मानसिकतेचे अचूक भान होते. हेच भान त्यांच्या कॉमन मॅन मधून व्यक्त होते.

             श्री.रविंद्र सिंह परदेशी पोलीस अधीक्षक चंद्रपूर यांनी त्याचाच भाग म्हणून सामान्य माणूस म्हणजेच “कॉमन मॅन” ही संकल्पना केंद्रबिंदू ठरविले आहे.

             महाराष्ट्र पोलीस अहोरात्र प्रयत्न करीत आहेत,त्या अनुषंगाने पोलीस ठाणे सिंदेवाही येथे श्री. आर .के. लक्ष्मण यांना स्मरण करून सामान्य माणूस ” कॉमन मॅन” यास केंद्रबिंदू ठेवून त्यांच्या अडीअडचणी जाणून घेऊन त्यांना योग्य न्याय मिळावा याबाबत प्रयत्न करीत आहेत.

            सदर बाबतचे रेखाचित्रे सिंदेवाही पोलीस ठाणे येथे रेखाटले आहे.