रश्मी डोके बनसोड यांना दीक्षांत समारंभात आचार्य पदवी प्रदान…

धानोरा /भाविक करमनकर 

      जिल्हा परिषद कनिष्ठ महाविद्यालय धानोरा येथे इंग्रजी विषयाचे कनिष्ठ अधिव्याख्याता कुमारी रश्मी शंकरराव डोके(बनसोड) यांना गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली येथील दहाव्या दीक्षांत समारंभात भारताचे महामंहिम राष्ट्रपती श्रीमती द्रोपदी मुर्मू यांचे प्रमुख उपस्थितीत व महामहिम राज्यपाल रमेश बैस यांच्या अध्यक्षतेमध्ये कुलगुरू डॉ प्रशांत बोकारे व प्र कुलगुरू डॉ श्रीराम कावडे यांच्या शुभहस्ते आचार्य पदवी प्रदान करण्यात आली.

           इंग्रजी विषयांमध्ये त्यांनी आचार्य पदवी प्राप्त केली.डॉ रश्मी डोके बनसोड यांनी प्राचार्य डॉ.पी.अरुणप्रकाश यांच्या मार्गदर्शनात इंग्रजी विषयात पदवी प्राप्त केली.

             “पोस्टमॉडर्न न्यारेटिव स्ट्र्याटेजीस इन द नोवेल्स ऑफ यान मार्टेल “हा शोध प्रबंधाचा त्यांचा विषय होता त्यांचे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध नामांकित जर्नल मध्ये शोध प्रबंध प्रकाशित करण्यात आले आहेत.

               त्यांनी आपल्या यशाचे श्रेय मार्गदर्शक प्राचार्य डॉ.पी.अरुणप्रकाश,शंकरराव डोके वडील,आई सौ उर्मिला डोके,गुरुदास बनसोड ,श्रीमती शेवंता बनसोड, प्रा ज्ञानेश बनसोड ,प्रमोद,उमेद,अरुणा डोके यांना दिले आहे.

            सर्व आप्तेष्ट व मित्रपरिवाराने त्यांना शुभेच्छा देऊन कौतुक केले आहे.. व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्यात.