वंचित बहुजन आघाडीचा जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा..  — त्यांना फाशीची शिक्षा ठोठवावी,त्यांच्यावर फौजदारी कारवाई करावी…

 

नागपूर विभागीय प्रतिनिधी-ऋग्वेद येवले

 भंडारा:वंचित बहुजन आघाडी भंडारा जिल्ह्याच्या वतीने महाराष्ट्र राज्यात मागासवर्गीय,बौद्ध ,मुस्लिम,आदिवासी,भटके विमुक्त,तथा अल्पसंख्यांक घटकावर सातत्याने होत असलेल्या अन्याय-अत्याचाराच्या विरोधात मोर्चा काढण्यात आला.

           या मोर्चातील प्रमुख मागण्यांमध्ये बीड जिल्ह्यातील परळी शहरात पोलीस चौकशी दरम्यान ताब्यात घेतलेल्या 48 वर्षीय जरीन शेख पाटीवाला या मुस्लिम व्यक्तीच्या पोलीस मारहाण दरम्यान पोलीस स्टेशनमध्ये मृत्यू झाला त्याची सखोल चौकशी करून पोलीस कर्मचारी यांना बडतर्क करावे व त्यांच्यावर सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करण्यात यावा,नांदेड जिल्ह्यातील बोंढार हवेली गावामध्ये भीम जयंती साजरी करण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या बौद्ध समाजातील युवक अक्षय भालेराव यांची गावगुंडा च्या वतीने निघून हत्या करण्यात आली त्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी,पंढरपूर येथे महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा शिस्तप्रिय वारकऱ्यांवर पोलिसांतर्फे लाठी चार्ज करण्यात आला त्यातील पोलीस अधिकारी व राजकीय व्यक्ती यांच्यावर गुन्हा दाखल करून सदोष चौकशी करण्यात यावी,लातूर जिल्ह्यातील रेणापूर येथे 3000 रुपयासाठी गुंड सावकाराने मातंग समाजाच्या युवकाच्या डोळ्यात मिरची पूड टाकून त्याला राडने मारत हत्या केली,यामुळे आरोपी सावकाराला फाशीची शिक्षा देण्यात यावी.

          चंद्रपूर जिल्ह्यातील वेरूळ पोलीस स्टेशनच्या हद्दीत बल्लारपूर आरपीएफ साऊथ रेल्वे चौकी येथे चौकशी दरम्यान ताब्यात घेतलेल्या 29 वर्षीय अनिल गणपत मडावी या आदिवासी व्यक्तीचा मृत्यू झाला या प्रकरणातील पोलीस कर्मचाऱ्यांना तात्काळ बढतर्क करून त्यांच्यावर सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करण्यात यावा,मुंबई येथील मरीन ड्राईव्ह सावित्रीबाई फुले या महाराष्ट्र शासनाच्या वस्तीगृह एका तरुण विद्यार्थिनीचा विवस्त्र अवस्थेत मृतदेह आढळून आला या प्रकरणात सखोल चौकशी करून सर्व आरोपींना अटक करण्यात यावी तसेच वस्तीगृहाच्या वार्डन वर गुन्हा दाखल करण्यात यावा,महिलांच्या सुरक्षा संबंधात तात्काळ उपयोजना करण्यात यावी.एमपीएससी उत्तीर्ण दर्शना पवार या युवतीचा मृतदेह रायगडच्या पायथ्याशी आढळून आला,एकतर्फी प्रेमातून अगन्य प्रकार करणाऱ्या व्यक्तीला फाशीची शिक्षा देण्यात यावी.बाबासाहेबांची रिंगटोन वाजली म्हणून शिर्डी येथे झालेल्या सागर शेजवळ हत्याकांडाची कोपरगाव कोर्टात सुरू असलेली न्यायालयीन कारवाई नाशिक अथवा औरंगाबाद येथील ॲट्रॉसिटी विशेष न्यायालयात स्थलांतरित करण्यात यावी इत्यादी मागण्यांचा समावेश आहे.

         भंडारा जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले. त्यामध्ये के ए नान्हे ,भगवान बोंडे ,महिला निरीक्षक सुनीता टेंभुर्ण, मुस्ताक पठाण, जिल्हा अध्यक्ष धनपाल गडपायले, महासचिव दिलीप वानखेडे ,जिल्हा संघटक डी.जी. रंगारी , युवा अध्यक्ष दीपक जंनबंधू, सुरेश खंगार,चरणदास मेश्राम, अॅड. वालदेकर, इत्यादींनी मोर्चेकरांना मार्गदर्शन केले व यानंतर शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.

           मोर्चामध्ये तालुकाध्यक्ष जगदिश रंगारी,दीपक जंनबंधू, लाखांदूर अध्यक्ष प्रभाकर मेश्राम,मुन्नी शेंडे,धर्मदास भांबोरे ,राधेश्याम कावळे , अमित वैध, गणेश गजभिये, यादोराव गणवीर ,साधना लाडे , रेखा रामटेके, प्रवीण कोचे,अड सुजाता वालदेकर, श्रीकांत नागदेवे, सलाम पठाण, कल्लु बावा, बबलु शेख, एजाज शेख, तैसियेत सय्येड, चंद्रशेखर खोबरागडे, सी डी गवरे ,बहुसंख्य कार्यकर्ते मोर्चा सहभागी झाले होते विशेष.