जागृत जनता धडकली नगरपरिषदेवर,वाचणार ६० वर्षांपासूनचे गरीबाचे दूकान.. — न.प.ने दिले होते अतिक्रमण पाडण्याचे नोटीस.. — शहरातील अव्याढव्य अतिक्रमणे सोडून गरीबाला नोटीस का.?  — मुख्याधिकाऱ्यां सोबतच्या चर्चेत निघाला तोडगा.. 

नागपूर विभागीय प्रतिनिधी-ऋग्वेद येवले

        साकोली : शहरातील जूने ६० वर्षांपासूनचे आणि कर टैक्स भरीत असलेले गरीबाचे सलून दूकानाचे अतिक्रमण काढण्यासाठी नगरपरिषदेने पाच दिवसांपूर्वी नोटीस बजावले होते.

            पण शहरात अव्याढव्य होत असलेले अतिक्रमण न काढता या मुळनिवासी गरीबावरच ही गदा का.? असा संतप्त सवाल उचलून येथील जागरूक जनता व फ्रिडम युथ फाऊंडेशन शुक्रवार ०६ जुलैला साकोली नगरपरिषदेर धडकली व मुख्याधिकारी यांच्याशी चर्चा करीत अखेर त्या गरीबाला तिथेच सदर दूकान कायम राहील असे आश्वासन या शिष्टमंडळाला मुख्याधिकारी यांनी दिले आहे. 

            शहरात जूने बसस्थानक, बाजूला वडीलोपर्जित मुकेश फुलबांधे यांचे छोटेसे सलूनचे दूकान आहे.येथून एक छोटी बोळ पायवाट आहे.सध्या गरज नसतांना नगरपरिषद सदर पायवाटेवर सिमेंट रस्ता तयार करीत आहे,यासाठी या सलून दूकानाला २६ जुन २०२३ ला सदर अतिक्रमण काढण्यासाठी नोटीस दिले.

              मुकेश फुलबांधे सलून दूकान हे ६० वर्षांपासून टैक्स भरीत आहे.मग शहरातील ताजे होत असलेले अतिक्रमण तथा शासकीय जागाच विकून अव्याढव्य होत असलेले अतिक्रमण न बघता एका मूळनिवासी गरीबावरच ही नोटीसची गदा का.?

           अगोदर साकोली सेंदूरवाफा शहरातील किती बाहेरच्या लोकांनी शासकीय भूखंडावरील अतिक्रमण करून काहींनी जागाच विकून पळाले यांवर आतापर्यंत कोणती कारवाई करण्यात आली.? सध्या शहरात होत असलेले नगरपरिषद हद्दीतील अतिक्रमणांवर काय कारवाई केली.? व का केली नाही. मग येथे ६० वर्षांपासून ग्रामपंचायत काळापासूनच नियमाने टैक्स भरीत असलेले गरीबाचे सलून दूकानावर नगरपरिषदेनी कसे काय नोटीस बजावले.? अगोदर नवे अतिक्रमणे तोडा नंतरच या जून्या व टैक्स भरीत असलेल्या दूकानाला हात लावा असा संतप्त सवालही येथे उचलून हे सर्व प्रश्न उपस्थित करण्यात आले.

              आलेल्या शिष्टमंडळाने मुख्याधिकारी मंगेश वासेकर यांचेशी अशा गंभीर विषयावर चर्चा करण्यात आली. शेवटी मुख्याधिकारी मंगेश वासेकर यांनी यावर तोडगा काढण्यासाठी पुढाकार घेतला.सदर जूने ६० वर्षांपासूनचे गरीबाचे सलून दूकान तिथून न हटविता आजूबाजूला स्थायीरूपी केले जाईल असे सर्वांसमोर आश्वासन दिले व हमी दिली. 

        या शिष्टमंडळात फ्रिडम युथ फाऊंडेशन अध्यक्ष किशोर बावणे,भाजपा शहर अध्यक्ष किशोर पोगळे, श्याम शिवणकर, नरेश भुरे, समिर सुर्यवंशी, मुकेश फुलबांधे, करीम शेख, कार्तिक कावळे, सोनू कावळे, पुरूषोत्तम कोटांगले, आनंद निखुरे, मुबारक शेख, हेमंत चांदेकर, दूर्योधन फुलबांधे, मोहित कराडे व अन्य जागृत जनतेच्या प्रयत्नाने एका गरीबाचे ६० वर्षांपासूनचे असलेले अतिक्रमण आज नगरपरिषदेवर धडकल्याने त्या गरीबाला अखेर न्याय मिळाला हे विशेष.