श्री लांडगे सरांना निरोप. 

 

छन्ना खोब्रागडे प्रतिनिधी

श्री साईनाथ विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय मालेवाडा येथे दिनांक 5 जुलै 2023 रोजी सेवानिवृत्त शिक्षक श्री एस आर लांडगे यांना निरोप देण्यात आला. याप्रसंगी अध्यक्ष म्हणून संस्थेचे सचिव श्री पी.आर.आकरे सर तसेच प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. एम. व्ही. आकरे ,आनंदरावजी आकरे,राजूजी आकरे, प्राचार्य जीपकाटे सर ,टी.एफ.बोगा, लोथे सर उपस्थित होते. सर्व पाहुण्यांचे स्वागत पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले. त्यानंतर श्री लांडगे सर व त्यांच्या अर्धांगिनी सौ सुनंदाताई लांडगे यांचा शाल , श्रीफळ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. यानंतर प्रास्ताविक भाषणातून प्राचार्य जीभकाटे सर यांनी लांडगे सर यांच्या विषयी माहिती दिली .त्यानंतर निंबेकर सर ,साळवे सर, खोब्रागडे सर यांनी आपापला अनुभव भाषणाच्या माध्यमातून व्यक्त केला .शेवटी अध्यक्षीय भाषणातून श्री आकरे सर यांनी सांगितले की लांडगे सर सदैव विद्यार्थ्यांचे प्रेरणास्थान राहतील. कार्यक्रमाचे संचालन श्रीमती लाखे मॅम तर आभार प्रदर्शन करमरकर सर यांनी केले .

कार्यक्रमाच्या यशस्वी करतात सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी महत्त्वाचे योगदान दिले.