तालुक्यातील रानतळोधी ग्रामस्थांना मिळाले हक्काचे कागदपत्रे…

उमेश कांबळे ता प्र भद्रावती 

       कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ घेण्याकरिता दाखले व प्रमाणपत्रांची गरज असते. परंतु अनेक दशकांपासून भद्रावती तालुक्यातील रानतळोधी येथील ग्रामस्थ याना हक्काचे कागदपत्र नसल्याने शासकीय योजनांपासून वंचित होते. रानतळोधी गाव ब्रिटिश काळात वसवले गेले. पूर्ण गावात आदिवासी समाजाची वस्ती आहे. परंतु वन ग्रामाचा दर्जा असल्यामुळे जातीचे दाखले काढण्यासाठी आवश्यक महसुली पुरावे उपलब्ध न्हवते. गावातील मुलांचे शिक्षण,नोकरी, विविध योजनांचे लाभ यापासून गावकरी, विद्यार्थी वंचित होते. सदर गाव ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या कोर भागात असल्याने गावकरी प्रत्येक कागदपत्रांसाठी दोन तास दूर असलेल्या तालुका मुख्यालयी येऊ शकत न्हवते. महा राजस्व अभियाना अंतर्गत ‘ शासन आपल्या दारी, योजनें अंतर्गत गावात शिबिर राबविण्यात आले. शिबिरात गावकऱ्यांना तहसिल कार्यालय भद्रावती मार्फत वेळोवेळी मार्गदर्शन करण्यात आले. गावात शिबिर आयोजित करून रानतळोधीतील ग्रामस्थांना हक्काचे कागदपत्रे मिळविण्यात यश मिळविले आहे. आता या ग्रामस्थांना या आधारे शासनाचा विविध योजनांच्या फायदा मिळणार आहे. 

       आज भद्रावती तहसील कार्यालयाच्या वतीने रानतळोधी येथील महा राजस्व अभियान मोहिमेतील लाभार्थी यांना आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या हस्ते विविध प्रकारचे दाखले व प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. 

         यावेळी जिल्हाधिकारी विनय गौडा, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, तहसिलदार अनिकेत सोनवणे, संवर्ग विकास अधिकारी मंगेश आरेवार, उपसंचालक ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प नंदकिशोर काळे, सामाजिक कार्यकर्ते सुधीर मुळेवार, काजल मडावी, मुख्याध्यापक केशव नवघरे, मंडळ अधिकारी अनिल दडमल, तलाठी खुशाल म्हस्के, ग्रामसेवक विजय पचारे, महा ई सेवा सेतू केंद्राचे निलेश पाटील, सदस्य मंगल आत्राम, पंकज अलाम, रत्नपाल आत्राम, बेबीनंदा आत्राम, अरुणा नन्नावरे, सुधाकर कुंमरे यांची उपस्थिती होती. सूत्रसंचालन प्रशांत कऱ्हाडे यांनी केले.

         जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्यासाठी प्रशासन कटिबध्द असून सर्व समावेशक विकासात प्रशासन करत असलेल्या कामाची माहिती दिली व मार्गदर्शन केले. तसेच रान तळोधी गावाचे पुनर्वसन संदर्भात आढावा घेऊन संबंधित प्रश्न मार्गी लावण्यासाठी सूचना दिल्या

           आमदार प्रतिभाताई धानोरकर यानी बोलताना पूर्वी देखील विशेष मोहीम लावून अनेक गावातील ग्रामस्थांना दाखले व प्रमाणपत्रे तात्काळ उपलब्ध करून दिली होती. या भागातील शेवटच्या घटकापर्यंत शासनाच्या योजना पोचण्याकरिता प्रशासन करत असलेल्या कामाचे कौतुक केले. तसेच सदर भागातील पुनर्वसन समस्या सोडविण्यासाठी जातीने लक्ष देण्याचे आश्वासन दिले .