जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सार्सी येथे केंद्रस्तरीय शिक्षण परिषद…

युवराज डोंगरे,खल्लार..

       उपसंपादक 

       जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सार्सी येथे केंद्रस्तरीय शिक्षण परिषद पार पडली.या शिक्षण परिषदेच्या अध्यक्षस्थानी पंकज भालेकर अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती सार्सी हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून राजेश उगले मुख्याध्यापक माध्यमिक शाळा सार्सी हे होते.

           याचबरोबर प्रमुख मार्गदर्शक म्हणून पांडुरंग एम.भगेवार प्रभारी केंद्रप्रमुख, धानोरा फसी हे होते.राजकुमार गायकी स्वागताध्यक्ष म्हणून तर रवीकुमार मेश्राम मुख्याध्यापक जि.प.शाळा सार्सी हे विचापीठावर उपस्थित होते.

        क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व दिप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. 

           उपस्थित सर्व मान्यवरांचे व केंद्रातील उपस्थित सर्व मुख्याध्यापकांचे शाळेच्या वतीने गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले.

         उपस्थित असलेल्यांनी शिक्षण परिषदेला मार्गदर्शन केले. विनय कोठाळे यांनी आदर्श पाठ घेतला.

     या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आदटराव यांनी केले तर आभार प्रदर्शन शेख फकीर यांनी केले.

         कार्यक्रम यशस्वितेसाठी केंद्रातील शंकर चव्हाण,अतुल सोनार,धनंजय थोरात,सुनिल दुधे,अरविंद कदम,गजानन सानप,गोपाल सोळंके,विनोद हिरोडे,अलका बोंडे,ललिता इंगोले,प्रणाली कावरे,धीरेद्र दांगटे,ज्योती बनकर,संगीता गद्रे,अरुणा राठोड,हेमलता भोपाळे,लता गुल्हाने,वैशाली मालवे,मंगेश शिसोदे यांच्यासह केंद्रातील बहुसंख्य शिक्षकांनी परिश्रम घेतले.