ना बोरवेले ना विहिरी तरीही दुसऱ्या मजल्याच्या सिंटेक्स होत आहेत हाऊसफूल !.. — नगरात व्यथा पाण्याची… — अनेक प्रभागात कमी दाबने पानी पुरवठा… — पम्प लाऊन पाण्याच्या चोरीचे प्रमाण वाढले…

     सुधाकर दुधे

सावली तालुका प्रतिनिधि 

नव्या शुद्ध नळ कनेक्शन चे उद्दिष्ट पूर्ण होण्या आधी शहरात सुरु असलेली साधी आणि फिल्टरचा पाणी पुरवठा योजना खंडित केल्याने शहरात पाणी पेटण्याची शक्यता वर्तविली जात आहे.दरम्यान दोन्ही जुन्या नळ योजनेचा पाणी पुरवठा बंद झाल्याने आणि नगरात कमी दाबाने नव्या पानी पूरवठयाला सुरुवात झाल्याने मिळनाऱ्या कमी पण्यामुळे नवी पानी पुरवठा योजना डोकेदुखी ठरत आहे.

            मात्र आशा गंभीर बाबिकडे स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष होताना दिसते. त्यामुळे नगरातील अनेक प्रभागामधे कमी दाबाच्या पानी पूरवठयामुळे पाण्याची समस्या निर्माण होत आहे. परिणामी नगरात पान्यासाठी बोम्ब सुरु आहे मात्र घरी ना बेरवेल ना विहीर तरीही धनदांडग्याच्या दुसऱ्यामाळयावरील सिंटेक्स हाउसफुल होताना दिसतात पम्प लाऊन पाण्याची चोरी सुरु असल्याने याचा फटका सर्व सामान्याना होताना दिसतो. तत्कालीन ग्रा प च्या काळात शहरात पाण्याची सुविधा निर्माण व्हावी म्हणून साधी नळ योजना कार्यान्वीत करण्यात आली.

          त्यामुळे पाण्याची समस्या काहीसी दूर झाली. त्यातही साध्या नळ योजनेचा नेहमीचा लपंडाव सुरु झाल्याने शहरात पाण्याची भीषण समस्या निर्माण झाली.

            यावर रामबाण उपाय म्हणून ग्रा प ने फिल्टर ची पाणी पुरवठा योजना कार्यान्वित,केली मात्र दोन्ही पानी पुरवठा योजना योग्य रीतीने चालू राहु शकल्या नाही. त्यामुळे सावली शहरात नेहमीची पाण्याची मोठी समस्या निर्माण होत होती.पाण्यासाठी शहर वाशियाना आंदोलन,निवेदने पलीकडे जाऊन घागर मोर्चा काढण्याची अनेकदा वेळ निर्माण झाली.

          दोन्ही नळ योजनेमुळे सार्वजनिक विहीरी, हैंडपंम्प याकडे प्रशासनाचे मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष झाल्याने,४० वर्षा पासून पाणी पाजणाऱ्या विहीरी दूषित झाल्या,पाणी पिन्यास अयोग्य असी सूचना प्रशासनाने विहिरीवर प्रकाशित केली.

          त्यामुळे विहिरिच्या पाण्याचा उपयोग केवळ कपड़े धुण्यासाठी केला गेला.एकीकडे कार्यान्वित दोन्ही नळ योजनेचा सातत्याने सुरु असलेला लपंडाव या सोबतच विहिरीचे पाणी पिण्यास अयोग्य अशा परिस्थितीत शहरात पाण्याची मोठी समस्या, निर्माण होताना शहरात शुद्ध पाण्याची व्यवस्था निर्माण व्हावी, म्हणून आमदार विजय वड्डेटिवार यांच्या पुढाकाराने सावली शहरात विद्यमान नगर पच्यायतीने पुढाकार घेत जलशुद्धीकरण केंद्रातंर्गत वाढीव पाणी पुरवठा योजना कार्यान्वीत करण्यात आली.

             शहरात पानी पुरवठा सुरु झाला मात्र अनेक प्रभागात कमी दाबाच्या पानी पूरवठ्यामुळे नवी पानी पुरवठा योजना नगर वासियासाठी डोकेदुखी ठरत आहे. त्यातही मोटर लाऊन पानी चोरीचे प्रकार मोठ्या प्रमानात सुरु असल्याने नगरात पाण्याची समस्या निर्माण होत आहे.

           त्यामुळे पानी चोरटयांवर कार्यवाही करुण किमान पानी पुरवठा सुरु असे पर्यंत विज खडित करन्यात येऊन नव्या पानी पूरवठयाचा दाब वाढवावा अन्यथा धुपकाळयाच्या दिवसात सावली नगरात पानी पेटल्या शिवाय राहणार नाही.

कोट

आमदार विजय वडेट्टीवार यांनी 12 कोटींची नलयोजना शहरात सुरू केली असून नगरपंचायत याकडे सर्वसामान्य जनतेला पाणी उपलब्ध व्हावे यासाठी लक्ष देत आहेत मात्र आजपर्यंत 4 ठिकाणी पंप लावून पाणी पुरवठा करणार्यांना दंड ठोठावला आहे त्यामुळे नळना पंप लावू नये.

स्वच्छता,आरोग्य व पाणीपुरवठा सभापती 

               प्रीतम गेडाम