अवैध रेती वाहतुकीवर् भद्रावती पोलिसांची धाड़… — 30 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात यश…

      उमेश कांबळे

तालुका प्रतीनिधी भद्रावती

            भद्रावती तालुक्यातील मौजा मांगली येथे अवैध रेती वाहतूक करित असल्याची गुप्त माहितीच्या आधारे धाड़ टाकुन एकुण् 30 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात भद्रावती पोलिसाना यश प्राप्त झाले आहे.

          तालुक्यातील मौजा मांगली येथील नाल्यातून एका जेसीबीने अवैध रेती चे उत्खनन करून एका हायवा ट्रक मध्ये भरून अवैधरित्या वाहतूक करीत आहे.

          सदर माहिती मिळताच पोलिस निरीक्षक सा.यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार रामप्रसाद नैताम, पोलीस अमलदार जितेंद्र पराते, अनिल पेंदोर यांनी धाड टाकली असता पायलेटिंग करणारा आरोपी आदम सुभान शेख राहणार भंगाराम वार्ड,भद्रावती आणि दूसरा परशुराम किशन मातनकर यास नमूद गुन्ह्यात ताब्यात घेतले.

           गुन्ह्यात वापरण्यात आलेले एक हायवा ट्रक क्रमांक एम एच ३४ ए बी ६७७६, व सदर ट्रक मध्ये पाच ब्रास रेती, सोबत एक मारुती सुझुकीची स्विफ्ट डिझायर कार क्रमांक एम एच ३४ सी डी ७५५७, व एक विना नंबर प्लेट चा जेसीबी असा ऐकून तीस लाख रुपयाचा मुद्देमाल सदर गुन्ह्यात जप्त करण्यात आला असून आरोपी विरुद्ध उपक्रमांक 241/24 कलम 379,34 भादवी प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

           ही सदर ची कारवाई पोलिस निरीक्षक बिपिन इंगळे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली.