अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ जिल्हा शाखा, अमरावती च्या जिल्हा कार्यकारिणीची महत्वपूर्ण सभा संपन्न.

युवराज डोंगरे

जिल्हा प्रतिनिधी अमरावती

          नुकतीच अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ जिल्हा शाखा अमरावती च्या जिल्हा कार्यकारिणीची महत्वपूर्ण सभा पंचायत समिती सभागृह अमरावती येथे नुकतीच पार पडली. 

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी पंडीतराव देशमुख हे होते तर प्रमुख मार्गदर्शक किरण पाटील, राजेंद्र होले, नीलकंठ यावले, सुनीता पाटील, ज्योती उभाड, संजय नागे, मनोज चौरपगार, पाथरे मॅडम, संजय वाटाणे, व्यासपीठावर उपस्थित होते.

     या कार्यक्रमाचे सूत्र संचालन किरण पाटील सर यांनी तर आभार प्रदर्शन गजानन चौधरी यांनी पार पाडले.

सभेमध्ये खालील विषयावरच चर्चा घडून आली.     

      अखिल संघाचे मागील सभेचे इतिवृत्त वाचून दाखवण्यात आले.

जिल्हा संघाचे निमंत्रित पाहुण्याच्या उपस्थिती बाबत आढावा घेण्यात आला. जिल्हा कार्यकारणी करिता विविध तालुक्यातून आलेल्या नावावर चर्चा करण्यात आली. जिल्हा अधिवेशना करिता विविध समित्यांचे गठण करण्यात आले. या व्यासपीठावरून नुकतेच जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक सूरज मंडे आणि सुनील बागडे यांचे संघटनेच्या वतीने पुष्पगुच्छ घेवून स्वागत करण्यात आले.

त्याचप्रमाणे सन्मान प्रेरणेचा सन्मान गुणवत्तेचा अंतर्गत ज्यांचा शाळा गुनानुक्रमे तालुक्यातून प्रथम द्वितीय क्रमांक आला अश्या शाळेचे मुख्याध्यापक आणि सहाय्यक शिक्षक यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात आले. त्यामधे प्रामुख्याने किरण पाटील, संजय वाटाणे, गणेश टिपरे यांचा समावेश होता. श्री प्रवीण सोनार यांनी अखिल संघात प्रवेश केल्याबद्दल त्यांचे जिल्हा संघ तर्फे स्वागत घेण्यात आले.

अखिल संघाचे राष्ट्रीय अधिवेशन दिनांक ११ ते १३ मे ला गांधीनगर गुजरात येथे होत आहे त्या संदर्भाने नियोजन करण्याविषयी चर्चा करण्यात आली. 

सभेच्या प्रोटोकॉल नुसार प्रत्येक विषयावर चर्चा घडून पदाधिकारी व 

सभासद यांनी लोकशाही पद्धतीनं अभिव्यक्ती स्वातंत्र्यनुसार आपापली मते ठेवली. त्यामधे प्रामुख्याने प्रफुल्ल भोरे, संतोष कोठाडे, मदन उमक, प्रशांत भगेवार यांनी आपले विचार व्यक्त केले.

     या सभेकरिता जिल्ह्यातील सर्व तालुका संघाचे अध्यक्ष, सरचिटणीस, कोषाध्यक्ष, कार्याध्यक्ष तसेच तालुका महिला आघाडीच्या अध्यक्ष, सरचिटणीस, कार्याध्यक्ष, कोषाध्यक्ष तसेच जिल्हा संघाचे सर्व पदाधिकारी व सन्माननीय सभासद आणि तालुका संघाचे समस्त कार्यकारिणी व सभासद, अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ, जिल्हा शाखा अमरावती चे उपस्थित होते. असे प्रशिद्धी प्रमुख सूरज मंडे यांनी कळविले आहे.