माजी जिल्हाप्रमुख राम गावडे आणि जयश्री पलांडे यांचा भाजपमध्ये प्रवेश….

दिनेश कुऱ्हाडे/  प्रतिनिधी

आळंदी : पुणे जिल्हा शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख राम गावडे आणि पुणे जिल्हा बँकेच्या माजी उपाध्यक्ष जयश्रीताई पलांडे यांच्यासह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते यांनी भारतीय जनता पक्षात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या उपस्थितीत आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते प्रवेश केला. यावेळी शिरूर लोकसभा मतदारसंघातील अनेक गावांतील शिवसेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.

        यावेळी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, जालिंदर कामठे, सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, आशाताई बुचके, अतुल देशमुख, शांताराम भोसले, संजय घुंडरे, पांडुरंग ठाकुर, भागवत आवटे, किरण येळवंडे, आकाश जोशी, संकेत वाघमारे, माऊली बनसोडे यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.

         यावेळी गेली अनेक वर्ष शिवसेनेच्या शाखाप्रमुख ते जिल्हाप्रमुखपदापर्यंत काम करणारे राम गावडे यांनी कार्यकर्त्यांना योग्य ते न्याय मिळावा या उद्दिष्टाने भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला असे राम गावडे यांनी सांगितलं तसेच शिवसेना सोडताना यावेळी ते भावुक झाले.