निलय झोडे
उपसंपादक
दखल न्यूज भारत
साकोली : “राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० नुसार जीवनाभिमुख शिक्षण देणारे पहिले पाऊल म्हणजे भारत टॅलेंट सर्च परीक्षा ( बीटीएस ) २०२६” अंतर्गत मुख्य साकोली शहरातील गणेश वार्डच्या जिल्हा परिषद केंद्र उच्च प्राथ. शाळा क्र. १ येथे रविवारी ३० मार्चला साकोली तालुक्यातील एकुण १६२ विद्यार्थ्यांनी ही अभिनव परीक्षा दिली. येथे उपक्रमशील शिक्षिका शालिनी राऊत यांनी मुख्याध्यापक सेवकराम हटवार यांचे मार्गदर्शनात आयोजन केले होते.
सदर परीक्षेला गणेश वार्ड या केंद्रावर लाखनी, साकोली, अर्जुनी मोरगाव, महालगाव, झाडगाव, चान्ना बाक्टी, सानगडी इत्यादी गावातील इयत्ता पहिली ते आठवी मराठी, सेमीइंग्रजी, इंग्रजी माध्यम सहभागी शाळा जिल्हा परिषद तसेच.खाजगी, अनुदानित शाळांतील विद्यार्थी सहभागी झाले होते.
या परीक्षेचा मुख्य उद्देश स्पर्धा परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना सक्षम करणे, स्पर्धा परीक्षेविषयी भीती दूर करून आवड निर्माण करणे इत्यादी असा आहे. येथे परीक्षा केंद्राध्यक्ष मुख्याध्यापक सेवकराम हटवार, परीक्षक शालिनी राऊत यांसह अनेक शिक्षकांनी परीक्षा नियंत्रक म्हणून जबाबदारी संपूर्णपणे सांभाळली होती.



