येवदा येथे वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न… — सुमनबाई कळमकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ 74 वृक्षांचे रोपण..

 

युवराज डोंगरे/खल्लार

      उपसंपादक 

        येवदा येथील आशीष मंडपमचे संचालक ज्ञानेश्वर कळमकर यांच्या मातोश्री सुमनबाई कळमकर यांचे वयाच्या 74 व्या वर्षी निधन झाले होते,त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ दरवर्षी 74 वृक्षांचे रोपन करण्यात येते.

          याही वर्षी अकोट – दर्यापूर महामार्गाच्या कडेला 74 वृक्ष लावण्यात आले.विशेष म्हणजे त्यांची निगा सुद्धा कळमकर स्वतः ठेवतात. 

            या छोटेखानी कार्यक्रमात सहभागी झालेल्या नागरिकांचा सन्मान करून त्यांना सुद्धा एक- एक वृक्ष भेट करण्यात आले. 

         आशिष मंडपम येथे पार पडलेल्या या कार्यक्रमाला सरपंच प्रतिभा माकोडे,प्रदीप देशमुख, तुळशीराम करुले,मधुभाऊ पाथरकर,हर्षराज किशोर देशमुख,किरण देशमुख,डॉ संजय पाटील,सुभाष लहाने,राजेंद्र माकोडे,शिवकुमार अग्रवाल,शिवानी अग्रवाल,नानाभाऊ कळमकर,हर्षदा कळमकर,अनंत बोबडे,सचिन बोदडे,राम रघुवंशी यांची उपस्थिती होती .