चेतक हत्तीमारे
जिल्हा प्रतिनिधी
लाखनी:-स्थानिक राष्ट्रीय शिक्षण संस्था द्वारा संचालित समर्थ महाविद्यालय, लाखनी येथे आज गुरू पौर्णिमा उत्सव निमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन आज दिनांक 3 जुलै रोज सोमवारला करण्यात आले होते. समर्थ महाविद्यालय येथील सांस्कृतिक विभाग आणि राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने गुरू पौर्णिमा व्याख्यान आयोजित करण्यात आले.
या व्याख्यानाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून माजी मुख्याध्यापिका सौ संध्या हेमणे व अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ दिगांबर कापसे व सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ बंडू चौधरी उपस्थित होते. गुरू प्रती विश्वास शिष्याने जपला पाहिजे. गुरू शिष्यांचे नाते जगात अनमोल आहे. या बाबद माजी मुख्याध्यापिका सौ. संध्या हेमणे यांनी विविध दाखले देत गुरूची महती हे सांगत असताना शिष्याने आपल्या गुरु प्रति आत्मसन्मान बाळगत स्वतःची प्रगती साधून गुरुदक्षिणा देणे यापेक्षा मोठे रून नाही. याप्रसंगी डॉ कापसे यांनी महाभारतातील व्यक्तिरेखा व दाखले देत अर्जुन आणि श्रीकृष्ण यांचे गुरू शिष्य यांचे नाते स्पष्ट केले. कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ बंडू चौधरी यांनी तर संचालन प्रा. रुपाली खेडीकर व आभार प्रा. युवराज जांभूळकर यांनी मानले.