युवराज डोंगरे
उपसंपादक
खल्लार :- जिल्हा परिषद उच्च प्राथमिक मराठी शाळा, वडूरा येथे केंद्र चंडिकापूर आणि सांगवा बु च्या संयुक्त विद्यमाने शिक्षण परिषद नुकतीच पार पडली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उर्दू शाळा चंडिकापूरचे मुख्याध्यापक शेख दाउद प्रमुख पाहुणे केंद्र शाळा सांगवा येथिल मुख्याध्यापक गणेश भातजोडे मुख्य मार्गदर्शक म्हणून दोन्ही केंद्राचे केंद्रप्रमुख अनिलकुमार वांगे उपस्थित होते.
सर्व प्रथम माता सावित्रीबाई जोतीराव फुले यांच्या प्रतिमेचे पूजन, पुष्पहार अर्पण व दिपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर शाळेच्या विद्यार्थ्यांनी परिपाठ सादर केला. उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.
केंद्र प्रमुख अनिलकुमार वांगे उपस्थित सर्व शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक वृंद यांना शासन स्तरावरून निर्गमित होणाऱ्या विविध प्रकारच्या शासकीय परिपत्रकानुसार आपल्या शाळेमध्ये कार्यवाही करावी याबाबत माहिती देण्यात आली.
मागिल शिक्षण परिषदेमधिल गुणवत्तेसंदर्भात आढावा घेण्यात आला.तसेच निपून महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत नुकत्याच झालेल्या चाचणीचा आढावा घेण्यात आला. क्षमता कौशल्य, अध्ययन निष्पत्ती, स्पेल बी उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांचा सहभाग वाढवून त्यानूसार तयारी करुन घ्यावी.
विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्यासाठी विविध प्रकारचे तंत्र आणि कौशल्ये वापरून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास कसा साधता येईल याकडे प्राधान्याने लक्ष देणे गरजेचे आहे. विद्यार्थी व्यक्तिमत्व विकास , वर्ग पातळीवर केलेल्या अध्ययन निष्पत्ती आधारित नियोजनाचे प्रत्यक्ष अंमलबजावणी करणे. सूलभकांनी सदर विषयानुसार अध्ययन निष्पत्ती निहाय मासिक नियोजन करण्यात यावे.
शाळा व्यवस्थापन समितीच्या बैठका शैक्षणिक आढावा पालक सभेचे सर्व स्तरावर आयोजन त्यांच्या बैठकांचा आढावा इत्यादी बाबत माहिती देण्यात आली. शिक्षण परिषद यशस्वी करण्याकरिता जि. प. शाळा वडूरा च्या मुख्याध्यापिका श्रीमती वणमालाताई शेवतकर यांनी विशेष परिश्रम घेतले.
अंगणवाडी सेविका सौ. मिनाताई उंबरकर प्रधानमंत्री पोषण आहार सेविका सौ. सुलभाताई नांदणे सौ .प्रतिक्षा हरणे यांनी विशेष सहकार्य केले.कार्यक्रमाला केंद्राचे मुख्याध्यापक ,शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन व प्रास्ताविक विजय मकेश्वर यांनी केले, तर आभार प्रदर्शन मनिषा लोणकर यांनी केले.



