Home कृषी शेतकऱ्यांच्या मागणीनुसार पुन्हा यार्डमध्येच ग्रेडींग, ५ मार्चपासून प्रक्रियेस प्रारंभ :- सभापती सुनिल...

शेतकऱ्यांच्या मागणीनुसार पुन्हा यार्डमध्येच ग्रेडींग, ५ मार्चपासून प्रक्रियेस प्रारंभ :- सभापती सुनिल पाटील गावंडे…

युवराज डोंगरे/खल्लार 

         उपसंपादक 

           सी.सी.आय. मार्फत सध्या कापूस खरेदी सुरू आहे.दर्यापूर बाजार समितीने मागिल वर्षीपासूनच कापूस लिलाव प्रक्रिया बाजार समिती यार्डवर सुरू केला होती. या उपक्रमाला शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद दिला होता.

          मात्र, कापसाची आवक मोठ्या प्रमाणात वाढत गेल्याने शेतकऱ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून शेतकऱ्यांच्या विनंतीला मान देत जिनिंगमध्येच ग्रीडींग (आद्रता) मॉच्चर करून हर्रास प्रक्रिया सुरू ठेवण्यात आली.

          झडता, कट्टी, वजनातील कपात, हमाली तसेच ग्रेडींगमधील तफावत याबाबत शेतकऱ्यांकडून लेखी तक्रारी व निवेदने मोठ्या प्रमाणात बाजार समितीकडे प्राप्त झाल्याने ग्रेडींग प्रक्रिया पुन्हा बाजार समिती यार्डमध्येच व्हावी, अशी स्पष्ट मागणी शेतकऱ्यांनी केली होती.

           या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या मागणीनुसार व त्यांच्या सोयीच्या दृष्टीने दिनांक 5 मार्चपासून ‘कपास किसान ॲप’वरून स्लॉट बुकिंग करूनच कापूस बाजार समिती यार्डवर विक्रीस आणण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

          या नव्या व्यवस्थेनुसार ग्रेडींग बाजार समिती परिसरातच केले जाईल.महत्वाचे म्हणजे, कापूस विक्रीस यार्डवरच आणण्याची कोणतीही सक्ती करण्यात आलेली नाही. शेतकऱ्यांना जिथे विक्री करणे सोयीचे वाटेल, त्या ठिकाणी त्यांनी आपल्या निर्णयानुसार कापूस विक्रीस न्यावा.

            तथापी बाजार समिती यार्डवर ग्रेडींग (आद्रता) मॉच्चर झालेल्या मालात किंवा जिनिंग प्रक्रियेत काही अडचण अथवा गैरप्रकार आढळल्यास बाजार समिती प्रशासन हस्तक्षेप करून मार्ग काढेल. इतर खाजगी व्यवहारांबाबत संबंधितांनी स्वतः जबाबदार राहावे, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

          हा निर्णय शेतकऱ्यांच्या लेखी मागण्या व तक्रारींच्या अनुषंगाने घेण्यात आला असल्याचे सभापती सुनिल पाटील गावंडे यांनी स्पष्ट केले आहे.

         शेतकऱ्यांनी कपास किसान ॲप द्वारे स्लॉट निश्चित करून सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. या निर्णयामुळे कापूस खरेदी प्रक्रियेत पारदर्शकता वाढून शेतकऱ्यांचा विश्वास अधिक दृढ होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.