राकेश चव्हाण
कूरखेडा तालुका प्रतिनिधी
रब्बी हंगाम २०२६–२७ साठी धान व मका खरेदी नोंदणीची मुदत वाढविण्याची मागणी पुढे आली आहे. शेतकर्यांची मागणी लक्षात घेता आमदार रामदास मसराम यांनी पत्राद्वारे उपसचिव, महाराष्ट्र शासनाकडे शेतकऱ्यांच्या हितासाठी ही महत्त्वाची मागणी केली आहे.
सध्या धान व मका खरेदी नोंदणीची मुदत मर्यादित असल्यामुळे अनेक शेतकरी नोंदणीपासून वंचित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही मुदत ३१ मे २०२६ पर्यंत वाढवावी, अशी मागणी करण्यात आली आहे. यामुळे एकही शेतकरी नोंदणीपासून वंचित राहणार नाही, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
शेतकऱ्यांना योग्य दरात पिक विक्रीची संधी मिळावी आणि त्यांना आर्थिक दिलासा मिळावा, यासाठी शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.




